मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! Android Smartphone वापरताना एक चूक पडेल भारी, थेट बँक अकाउंटला धोका

Alert! Android Smartphone वापरताना एक चूक पडेल भारी, थेट बँक अकाउंटला धोका

स्कॅमर्सच्या Android फोन युजर्सला एका नव्या Malware द्वारे टार्गेट करत आहे. मालवेयरचा नवा वेरिएंट डिव्हाइसमध्ये असलेल्या बँक Apps द्वारे पैसे चोरण्याचं काम करतो आणि डिव्हाइसचा डेटाही डिलीट करतो.

स्कॅमर्सच्या Android फोन युजर्सला एका नव्या Malware द्वारे टार्गेट करत आहे. मालवेयरचा नवा वेरिएंट डिव्हाइसमध्ये असलेल्या बँक Apps द्वारे पैसे चोरण्याचं काम करतो आणि डिव्हाइसचा डेटाही डिलीट करतो.

स्कॅमर्सच्या Android फोन युजर्सला एका नव्या Malware द्वारे टार्गेट करत आहे. मालवेयरचा नवा वेरिएंट डिव्हाइसमध्ये असलेल्या बँक Apps द्वारे पैसे चोरण्याचं काम करतो आणि डिव्हाइसचा डेटाही डिलीट करतो.

नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी: स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्समध्ये जवळपास 85 टक्के स्मार्टफोन्स अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर (Android Operating System) चालतात. Android फोन्स ओपन सोर्स बेस्ड सिस्टम आहे, त्यामुळे थर्ड पार्टी App देखील इन्स्टॉल केले जाऊ शकतात. त्यामुळे हे स्कॅमर्सच्या निशाणावर असतं. आता नवा व्हायरस पसरत असून तो Android फोन युजर्सला टार्गेट करत आहे.

या मालवेयरचं नाव BRATA (Brazilian Remote Access Tool, Android) असं आहे. BRATA Malware सर्वात आधी 2019 मध्ये पाहण्यात आला होता. आता याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. BRATA मालवेयरचा नवा वेरिएंट डिव्हाइसमध्ये असलेल्या बँक Apps द्वारे पैसे चोरण्याचं काम करतो आणि डिव्हाइसचा डेटाही डिलीट करतो. रिसर्चरने याबाबत अनेकांना इशारा दिला आहे. या मालवेयरने टार्गेट केलेलं डिव्हाइस फॅक्ट्री रिसेट करू शकतो असंही सांगण्यात आलं आहे.

Cleafy ने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा मालवेयर युजरच्या परवानगीशिवाय डेटाचा वापर करतो. केवळ डेटा नाही, तर BRATA मुळे ई-बँकिंग App द्वारे पैसे चोरी केले जातात. युजरच्या फोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या Banking Apps मधून बँक अकाउंटचा अॅक्सेस या व्हायरसला मिळतो. अॅक्सेस मिळाल्यानंतर हा व्हायरस सर्वात आधी फोन फॅक्ट्री रिसेट करतो.

हे वाचा - ग्राहकाने ऑर्डर केलं 50,999 रुपयांचं Apple Watch, डिलीव्हर झालेल्या प्रोडक्टने युजर हैराण

तसंच BRATA Malware युजरचं लोकेशनही ट्रॅक करतो. हा एक बँकिंग ट्रोजन आहे, जो युजरच्या अँड्रॉइड फोनला रिमोटली अॅक्सेस करतो. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल, तर चुकूनही थर्ड पार्टी App डाउनलोड करू नका.

हे वाचा - Public Wi-Fi सेफ नाही, हॅकर्स असा चोरी करतात डेटा; या गोष्टी लक्षात ठेवाच

तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन (Android Smartphone) मध्ये कधीही कोणतंही App डाउनलोड करताना Google Play Store चा वापर करा. चुकूनही एखाद्या लिंकवर क्लिक करुन App डाउनलोड करू नका. सोशल मीडिया साइट्सवरुन फेक लिंकद्वारे अनेक फ्रॉड केले जातात. त्यामुळे कोणत्याही माध्यमातून आलेल्या मेसेजमध्ये लिंकवर करण्याबाबत त्यानंतर ओटीपी, इतर पर्सनल डिटेल्स देण्याबाबत सांगितलं असल्याचं सावध व्हा. लिंकवर क्लिक करू नका. क्लिक केल्यास पुढील कोणतेही डिटेल्स देऊ नका. यामुळे फोनमध्ये धोकादायक व्हायरस, मालवेयर एन्ट्री करुन त्याद्वारे तुमचा फोन हॅकरच्या कंट्रोलमध्ये जाण्याची शक्यता असते. आणि यातून ऑनलाइन फ्रॉड होऊन बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं.

First published:

Tags: Android, Cyber crime, Malware, Online fraud, Personal banking, Smartphone, Tech news, Technology