• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक? जाणून घ्या कारणं...

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक? जाणून घ्या कारणं...

आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो तेव्हा आपल्याला वापरताना व्हॉट्सअ‍ॅप कडून सातत्यानं सांगण्यात येत की आम्ही तुमच्या प्रायव्हसीला नेहमी प्राधान्य देतो. व्हॉट्सअ‍ॅप चॅट ही लोकांची खाजगी बाब मानून त्यात कंपनीचा हस्तक्षेप होत नसतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज आणि इतर प्रकरणं उघडकीस आली होती. त्यात सातत्याने पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणांमध्ये काही बॉलिवू़ड सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून (bollywood celebrities WhatsApp chat leaked) त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यात प्रामुख्याने दीपिका पादुकोन, सारा अली खान आणि रिया चक्रवर्ती या बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यामुळं या चॅट लीक होतातच कशा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर नेमकं असं का होतं हे आपण जाणून घेऊयात. जेव्हा आपण व्हॉट्सअ‍ॅप वापरतो तेव्हा आपल्याला वापरताना व्हॉट्सअ‍ॅप कडून सातत्यानं सांगण्यात येत की आम्ही तुमच्या प्रायव्हसीला नेहमी प्राधान्य देतो. व्हॉट्सअ‍ॅप चॅट ही लोकांची खाजगी बाब मानून त्यात कंपनीचा हस्तक्षेप होत नसतो. परंतु 2020 मध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborthy) या अभिनेत्रीची व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाली होती. त्यानंर दीपिका पादुकोन (deepika padukone), सारा अली खान आणि आता चर्चेत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचीही चॅट लीक झाल्याचं बोललं जात आहे. Reliance लवकरच आणणार JioPhone Next; दिवाळीच्या आधीच धमाका, जाणून घ्या फिचर्स परंतु हा प्रकार काही सर्वांसोबत होत नाही, त्यात एखाद्या गुन्ह्यात जर एखादी व्यक्ती आरोपी असेल तर पोलिसांनी त्याविरोधात वारंट बजावलं तर त्यांना चौकशीसाठी आरोपींच्या मोबाईलचा अॅक्सेस घेता येतो. अशा वेळी पोलीस तपास करत असताना संबंधित आरोपींच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट मधून अनेक धक्कादायक खुलासे होतात. त्यानंतर त्या प्रकरणात काय प्रगती होत आहे, याचीही माहिती पोलिसांना माध्यमांना द्यावी लागते. तेव्हा या गोष्टी बाहेर येत असतात. PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात या तारखेपासून PUBG New State होणार रिलीज या चौकशीदरम्यान आरोपीला आपल्या मोबाईल फोन पोलिसांना द्यावा लागतो. त्यानंतर पोलीस त्या फोनची चौकशी करून काही पुरावे मिळतात का याची चौकशी करतात. त्याचमुळं या बॉलिवूड कलाकारांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्या होत्या. iPhone Hacked : चीनी हॅकर्सने फक्त 15 सेकंदात हॅक केला Apple iPhone 13 Pro त्यानंतर माध्यमांमध्ये त्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर या अभिनेत्रींनी ड्र्ग्ज संदर्भात कुणासोबत काय संभाषण केलं होतं हे समोर आलं होतं. आता अनन्या पांडे च्या चौकशीच्या निमित्ताने व्हॉट्सअ‍ॅप चॅट च्या लीक होण्याच्या प्रकरणावर पुन्हा चर्चा होत आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: