मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Best Waterproof Smartphones: स्वस्तात मस्त! हे 4 स्मार्टफोन आहेत वॉटरप्रूफ, 15000 रुपयांपेक्षाही कमी अन् 12500 पर्यंत सूट

Best Waterproof Smartphones: स्वस्तात मस्त! हे 4 स्मार्टफोन आहेत वॉटरप्रूफ, 15000 रुपयांपेक्षाही कमी अन् 12500 पर्यंत सूट

Best Waterproof Smartphones: स्वस्तात मस्त! हे 4 स्मार्टफोन आहेत वॉटरप्रूफ, किंमत 15000 रुपयांपेक्षाही कमी, 12500 पर्यंत मिळत आहे सूट

Best Waterproof Smartphones: स्वस्तात मस्त! हे 4 स्मार्टफोन आहेत वॉटरप्रूफ, किंमत 15000 रुपयांपेक्षाही कमी, 12500 पर्यंत मिळत आहे सूट

Best Waterproof Smartphones Under 15000 Rupees: आज आपण 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्‍या काही स्‍मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत, ज्‍यांच्‍यावर थोडंफार पाणी पडलं, तरी चालू शकते. म्हणजेच फोन चुकून भिजला तरी टेन्शन घेण्याची गरज नाही.

पुढे वाचा ...

मुंबई, 19 जून : देशात पावसाळा (Rainy Season) सुरु झालाय. अनेक भागांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. जर तुम्ही या मोसमात फोन घेण्याचा विचार करत असाल, तर वॉटरप्रूफ स्मार्टफोन (Waterproof Smartphone) खरेदी करणे तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला १५ हजारांच्या बजेटमधील काही लेटेस्ट स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यावर थोडंफार पाणी पडलं तरीही चालू शकते. म्हणजेच फोन थोड्या पाण्यात भिजला तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. चला जाणून घेऊया अशा चार स्मार्टफोनबद्दल...

15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम वॉटरप्रुफ स्मार्टफोन (Best Waterproof Smartphones Under 15000 Rupees):

1. Poco M4 Pro 5G:

हा स्मार्टफोन IP53 प्रोटेक्शनसह येतो, म्हणजे तो डस्टप्रूफ तर आहेच शिवाय त्याच्यावर थोडंफार पाणी पडलं तरीही तो सुरक्षित आहे. अधिकृत साइटवर या फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. तथापि, हा स्मार्टफोन 4GB + 64GB प्रकार Amazon वर 14,215 रुपये तर Flipkart वर 15,059 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट या स्मार्टफोनवर 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.

हेही वाचा: What's Appची ही ट्रिक तुम्हाला नक्की माहिती नसेल; जाणून घ्या PHOTO फॉरवर्ड करताना होईल उपयोग

2. Redmi 10 Prime 2022:

रेडमीचा हा स्मार्टफोन स्प्लॅश प्रूफ आहे म्हणजेच त्यावर पाण्याचे हलके स्प्लॅश कुचकामी आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत 11,499 रुपये आहे. ही किंमत 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी आहे. अधिकृत साइटनुसार, या फोनवर 10,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील घेतला जाऊ शकतो.

3. OPPO K10:

Oppo कडील हा परवडणारा फोन IP5X रेटिंगसह येतो, याचा अर्थ असा की त्यावर पाण्याचे हलके प्रमाण परिणाम करू शकत नाही. अधिकृत साइटनुसार, फोनच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 14,990 रुपये आहे. Flipkart फोनवर 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.

हेही वाचा: IRCTC Ticket: ट्रेनचे तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळेल रिफंड; काही मिनिटांत होईल बुकींग; फॉलो करा ही प्रोसेस

4. Moto G40 फ्यूजन:

मोटोचा हा शक्तिशाली स्मार्टफोन 6000mAh च्या तगड्या बॅटरीसह येतो. याचसोबत हा फोन वॉटर रिपेलेंट डिझाइनसह येतो. या स्मार्टफोनच्या 6GB + 64GB व्हेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. Flipkart या फोनवर 12,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस देत आहे.

First published:

Tags: Oppo smartphone, Smart phone, Smartphone