मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा स्मार्टफोन हरवला आहे? Google Maps च्या मदतीने काही मिनिटांत शोधा, ही आहे प्रोसेस

तुमचा स्मार्टफोन हरवला आहे? Google Maps च्या मदतीने काही मिनिटांत शोधा, ही आहे प्रोसेस

अँड्रॉईड स्मार्टफोन 'Find Your Phone' फीचरसह येतो. आज आम्ही तुम्हाला Google Maps च्या मदतीने स्मार्टफोनचे लोकेशन कसे शोधू शकता ते सांगणार आहोत. लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील.

मुंबई, 31 मे : स्मार्टफोन हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. वापरकर्त्यांना त्यांचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवणे आवडते. पण स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर अशा परिस्थितीत आयुष्य बेरंग झाल्यासारखं वाटतं. फोन हरवला तर डेटा, फोटो आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची चिंता सतावू लागते. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टेप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन सहज शोधू शकाल. यासाठी अॅपल युजर्सकडे 'Find My Phone' फीचर आहे. तर तिथे अँड्रॉइड स्मार्टफोन 'Find Your Phone' फीचरसह येतो. हे फीचर तुम्ही जिथे गेला आहात त्या ठिकाणांचा आणि स्थानांचा मागोवा घेते. Google Maps च्या मदतीने स्मार्टफोनचे लोकेशन कसे शोधता येते ते जाणून घेऊ. लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी फॉलो कराव्या लागतील.

Google Maps ने तुमचा स्मार्टफोन कसा शोधायचा

गुगल मॅपच्या मदतीने हरवलेला अँड्रॉइड स्मार्टफोन शोधण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे मोबाईल, लॅपटॉप किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेला कॉम्प्युटर असायला हवा. याशिवाय जीमेल अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड लक्षात असला पाहिजे. तुम्हाला फॉलो करावयाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्व प्रथम Google वर www.maps.google.co.in टाइप करा. यानंतर Google Maps उघडेल, येथे तुम्हाला तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनशी लिंक असलेला Google ID टाकावा लागेल.

या पद्धतीने सुरक्षित करा आपलं आधार कार्ड; कोणीही करू शकणार नाही गैरवापर

तुमचा स्मार्टफोन लगेच होईल ट्रॅक

आयडी साइन इन केल्यानंतर, वरच्या उजव्या बाजूला 3 ठिपके दिसतील, त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला 'Your timeline' हा पर्याय दिसेल. तुमचा टाइमलाइन पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला ते वर्ष, महिना आणि दिवस टाकावा लागेल ज्या दिवशी तुम्हाला लोकेशन हिस्ट्री पाहायची आहे. सर्व माहिती प्रविष्ट केल्यानंतर, तुमची लोकेशन हिस्ट्री दिसायला लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही कोणत्याही अँड्रॉइड फोनमध्ये असलेल्या Google Maps मध्ये हे फीचर वापरू शकता. तुमच्या मोबाईलशी लिंक केलेल्या आयडीने Google Maps वर साइन इन करा. हँडसेटमध्ये हे फीचर वापरण्याची पद्धतही तशीच आहे. जेव्हा तुमचा मोबाईल आणि त्यात असलेले लोकेशन सर्व्हिस फीचर चालू असेल तेव्हाच हे फीचर व्यवस्थित काम करेल.

First published:

Tags: Google, Smartphone