मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

What's Appची ही ट्रिक तुम्हाला नक्की माहिती नसेल; जाणून घ्या PHOTO फॉरवर्ड करताना होईल उपयोग

What's Appची ही ट्रिक तुम्हाला नक्की माहिती नसेल; जाणून घ्या PHOTO फॉरवर्ड करताना होईल उपयोग

What's Appची ही ट्रिक तुम्हाला नक्की माहिती नसेल; जाणून घ्या PHOTO फॉरवर्ड करताना होईल उपयोग

What's Appची ही ट्रिक तुम्हाला नक्की माहिती नसेल; जाणून घ्या PHOTO फॉरवर्ड करताना होईल उपयोग

आपली लोकेशन, कॉन्टॅक्ट किंवा आता तर अगदी पैसेही पाठवणं व्हॉट्सअ‍ॅपवरून (WhatsApp sharing) शक्य झालं आहे. दररोज हजारो फोटोही शेअर होत असतात. पण व्हॉट्स अॅपवर फोटो फॉरवर्ड करण्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.

मुंबई, 17 जून: व्हॉट्सअ‍ॅपमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे. सुरुवातीला केवळ टेक्स्ट मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी कामी येणारं व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आता बऱ्याच गोष्टींसाठी फायद्याचं ठरतं आहे. आपली लोकेशन, कॉन्टॅक्ट किंवा आता तर अगदी पैसेही पाठवणं व्हॉट्सअ‍ॅपवरून (WhatsApp sharing) शक्य झालं आहे. दररोज शेअर होत असलेले लाखो फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून व्हॉट्अप एक मनोरंजनाचं माध्यमही झालं आहे. एखादा मनोरंजक किंवा माहितीपूर्ण फोटो बऱ्याच वेळा लोक कित्येकांना फॉरवर्ड (WhatsApp forward trick) करत असतात. मात्र, फोटोसोबत जर एखादं कॅप्शन असेल, तर ते कॅप्शन पुढच्या व्यक्तीला मिळतच नाही. केवळ फोटो फॉरवर्ड होतो. तुम्हाला जर एखादा फोटो त्याच्या कॅप्शनसह पुढे पाठवायचा असेल, तर त्यासाठी असलेली ट्रिक (WhatsApp Hack) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हेही वाचा - IRCTC Ticket: ट्रेनचे तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळेल रिफंड; काही मिनिटांत होईल बुकींग; फॉलो करा ही प्रोसेस व्हॉट्सअपवर तुम्हाला कॅप्शनसह एखादा फोटो आला असेल, आणि तुम्ही तो फॉरवर्ड केला; तर केवळ फोटोच समोरच्या व्यक्तीला मिळतो. मग तुम्हाला पुन्हा सगळं कॅप्शन (Forward Picture with Caption on WhatsApp) स्वतः टाईप करत बसावं लागतं. हे टाळण्यासाठी, आणि व्हॉट्सअपचा फोटो कॅप्शनसह पुढे फॉरवर्ड करण्यासाठी ही सोपी ट्रिक (WhatsApp Tricks) वापरून पाहा Step 1: सर्वांत आधी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा, आणि तुम्हाला जो फोटो फॉरवर्ड करायचा आहे तिथे जा. Step 2: या फोटोवर लाँग प्रेस करा, यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यात ‘Reply’, ‘Star’, ‘Delete’, ‘Share’ आणि ‘Forward’ अशा पर्यायांचे आयकॉन दिसतील. Step 3: यातील फॉरवर्ड (Forward) आयकॉनवर टॅप न करता, शेअर (Share) या आयकॉनवर टॅप करा. Step 4: शेअर आयकॉनवर टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व सोशल मीडिया अ‍ॅप्सचा पर्याय समोर येईल. यातून तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप हा पर्याय निवडायचा आहे. Step 5: यानंतर त्या कॉन्टॅक्ट किंवा चॅट ग्रुपचा पर्याय निवडा जिथे तुम्हाला फोटो आणि माहिती शेअर करायची आहे. यानंतर खाली उजव्या बाजूला असणाऱ्या ‘टिक’ बटणावर टॅप करा. Step 6: यानंतर तुम्हाला फोटो पाठवण्यासाठी कॅप्शन आणि फोटो एडिट करण्याचा पर्याय मिळेल. जर गरज असेल, तर तुम्ही ते एडिट करू शकता, अन्यथा उजव्या बाजूला खाली असलेल्या ‘Send’ पर्यायावर क्लिक करून आहे असा पाठवू शकता. अशा प्रकारे तुम्ही कॅप्शनसह एखादा फोटो पुढच्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या की अशाप्रकारे तुम्ही एका वेळी एकच फोटो पुढे पाठवू (WhatsApp Photo sharing trick) शकता. एकावेळी एकापेक्षा जास्त फोटो कॅप्शनसह पुढे पाठवण्याचा पर्याय उपलब्ध नाही.
First published:

Tags: Photo, Whats app news

पुढील बातम्या