मुंबई, 17 जून : भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी बहुतेक प्रवासी IRCTC च्या इंटरनेट तिकीट वेबसाइटवरून तिकीट बुक (Indian Railway Ticket Booking) करतात. IRCTC च्या म्हणण्यानुसार, एकूण आरक्षित तिकिटांपैकी सुमारे 83 टक्के तिकिटे याद्वारे बुक केली जातात. अशा परिस्थितीत, ऑनलाइन रेल्वे तिकीट रद्द करण्याचे प्रमाण देखील सर्वात जास्त आहे. काहीवेळा तिकीट रद्द केल्यावर रिफंड (Refund) मिळण्यास बराच वेळ लागतो आणि पैसे मिळतील की नाही याचं आपल्याला टेंशन येते. हा तणाव दूर करण्यासाठी आयआरसीटीसीने विशेष सेवा सुरू केली आहे.
नवीन सेवेद्वारे, जर एखाद्या प्रवाशाने IRCTC वेबसाइटवर ट्रेनचे तिकीट रद्द केले, तर रिफंड त्याच्या खात्यात त्वरित पोहोचेल. पण यासाठी तुम्हाला IRCTC-ipay पेमेंट गेटवे इन्स्टॉल करावे लागेल. IRCTC च्या ipay चे खास वैशिष्ट्य म्हणजे ते तिकीट बुक करताना लागणारा वेळ कमी करते आणि त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर पैसे परत मिळतात. आज आपण IRCTC ipay अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक करण्याची प्रक्रिया समजून घेऊया.
हेही वाचा: 5G Internet Service: आता येणार इंटरनेट स्पीडचा बाप! 'या' महिन्यात होईल सुरू, इतका असेल वेग
IRCTC ipay अॅपद्वारे ट्रेनचे तिकीट कसे बुक करावे?
हेही वाचा: बजाजची लोकप्रिय बाईक Pulsar नव्या रूपात होणार लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apps, Indian railway, Railway