मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

जुना फोन विकण्याआधी किंवा Exchange करण्यापूर्वी ही महत्त्वाची 3 कामं कराच; अन्यथा येईल मोठी समस्या

जुना फोन विकण्याआधी किंवा Exchange करण्यापूर्वी ही महत्त्वाची 3 कामं कराच; अन्यथा येईल मोठी समस्या

क्लिनिंग App - फोनची मेमरी वाढवण्यासाठी युजर्स अनेकदा क्लिनिंग Apps चा वापर करतात. या Apps ऐवजी गुगल फाईल्स App (Files by Google) चा वापर करा. हे क्लिनिंग App चंही काम करतं. हेदेखील स्टोरेज क्षमता चांगली करण्यासाठी मदत करतात.

क्लिनिंग App - फोनची मेमरी वाढवण्यासाठी युजर्स अनेकदा क्लिनिंग Apps चा वापर करतात. या Apps ऐवजी गुगल फाईल्स App (Files by Google) चा वापर करा. हे क्लिनिंग App चंही काम करतं. हेदेखील स्टोरेज क्षमता चांगली करण्यासाठी मदत करतात.

आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. बँकेसंबंधी माहिती, प्रायव्हेट फोटो, पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे जुना फोन विकताना काळजी घेणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 जुलै: अनेक जण नवा फोन (Smartphone) खरेदी करताना, आधीचा जुना फोन विकतात किंवा एखाद्याला वापरायला देतात. पण जुना फोन विकताना (Selling Phone) किंवा दुसऱ्याला वापरायला देताना किंवा Exchange करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या फोनमध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात. बँकेसंबंधी माहिती, प्रायव्हेट फोटो, पासवर्ड, सोशल मीडिया अकाउंट अशा अनेक गोष्टी सेव्ह असतात. त्यामुळे जुना फोन विकताना काळजी घेणं गरजेचं आहे.

Factory Reset -

जुन्या फोनमध्ये तो विकण्यापूर्वी किंवा दुसऱ्याला देण्याआधी Factory Reset करणं अतिशय आवश्यक आहे. असं केल्याने मोबाईलमधील डेटा डिलीट होईल. फोनच्या सेटिंगमध्ये बॅकअप अँड रिसेटचा ऑप्शन दिसेल. त्यातून फॅक्टरी रिसेट करता येईल.

(वाचा - 9 धोकादायक Apps कडून Facebook पासवर्ड्सची चोरी; पाहा कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB)

डेटा बॅकअप -

स्मार्टफोन विकण्यापूर्वी Data Backup घेणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या फोनमधील डेटा लीक होण्याची तसंच डिलीट होण्याची भीती राहणार नाही. यासाठी सेटिंगमध्ये बॅकअप ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचा डेटा आपोआप Google Drive वर सेव्ह होईल.

(वाचा - Mobile Phone हरवल्यास कसे परत मिळवाल Contact Numbers, जाणून घ्या सोपी पद्धत)

Google ID -

फोन विकण्याआधी Google ID डिलीट करणं गरजेचं आहे. यामुळे खासगी माहिती, पासवर्ड्स लीक होणार नाहीत. यासाठी सेटिंगमध्ये User and Accounts ऑप्शनमध्ये जावं लागेल. इथे Remove पर्यायावर क्लिक केल्यानंतर अकाउंट डिलीट होईल. नेहमी सोशल मीडियाचा वापर होत असल्याने अनेकदा आपल्या स्मार्टफोनमध्ये पासवर्ड सेव्ह असतात. Facebook, Instagram, Gmail सारखे अकाउंट्स फोनमध्ये ओपन असल्याने ते फोनमधून डिलीट करणं गरजेचं आहे. तसंच फोनमधील कॉन्टॅक्ट नंबर्सचाही बॅकअप घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone, Smartphone, Tech news, Technology