मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

9 धोकादायक Apps कडून Facebook पासवर्ड्सची चोरी; पाहा कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB अकाउंट

9 धोकादायक Apps कडून Facebook पासवर्ड्सची चोरी; पाहा कसं सुरक्षित ठेवाल तुमचं FB अकाउंट

काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं, सिक्योर करणं आवश्यक आहे.

काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं, सिक्योर करणं आवश्यक आहे.

काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं, सिक्योर करणं आवश्यक आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 14 जुलै : डॉक्टर वेब मालवेअर एनालिस्टने (Doctor Web Malware) नुकतेच 10 मॅलेशियस अ‍ॅप स्पॉट केले होते, जे फेसबुक युजर्सचे (Facebook user) लॉगइन आणि पासवर्ड चोरी करत होते. 10 पैकी 9 अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) उपलब्ध होते. सिक्योरिटी अ‍ॅनालिस्टनुसार, हे व्हायरस असणारे अ‍ॅप्स धोकादायक सॉफ्टवेअरच्या रुपात पसरले होते आणि हे अ‍ॅप्स 5,856,010 वेळा इन्स्टॉलही करण्यात आले होते.

कंपनीकडून रिपोर्ट केल्यानंतर आता हे 9 धोकादायक अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवण्यात आले आहेत. अशात तुमचा फेसबुक डेटा (Facebook Data) धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवून फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवणं, सिक्योर करणं आवश्यक आहे.

फेसबुक पासवर्ड -

सर्वात आधी फेसबुक पासवर्ड (Facebook Password) बदलणं गरजेचं आहे. पासवर्ड ठेवताना कठीण पासवर्डचा वापर करा. ‘12345678’, ‘qwerty123’ अशा पासवर्डचा वापर करू नका. पासवर्ड तुमची जन्मतारिखही ठेवू नका. पासवर्डमध्ये कॅरेक्टर, नंबर्स, लहान-मोठे कॅप्स असा वापर करा.

(वाचा - सावधान! हे अँड्रॉईड Apps चोरी करतात युजर्सचा Facebook पासवर्ड, लगेच करा डिलीट)

Facebook पासवर्ड कसा कराल चेंज -

- सर्वात आधी Facebook Settings मध्ये जा. इथे Security सिलेक्ट करा. Login चा पर्याय मिळेल, त्यावर टॅप करा.

- Login सेक्शनखाली Change Password बटणावर क्लिक करा.

- इथे तुमचा आधीचा पासवर्ड आणि नवा पासवर्ड टाका आणि Save Changes वर क्लिक करा.

सर्व Device Logout -

तुम्ही ज्या डिव्हाईसमधून फेसबुक लॉगइन केलं आहे, त्या सर्व डिव्हाईसवर लॉगआउट करणं गरजेचं आहे.

- यासाठी सर्वात आधी Facebook Settings मध्ये जा.

- Security वर टॅप करुन Login ऑप्शनवर क्लिक करा.

- Logged in सेक्शनखाली Show More बटणावर क्लिक करा.

- इथे Logout of all sessions वर क्लिक करा.

First published:

Tags: Facebook, Tech news