• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • गेम लाँच होण्याआधीच फेक लिंक Viral, डाऊनलोड केला असेल तर तुमचा खासगी डेटा धोक्यात

गेम लाँच होण्याआधीच फेक लिंक Viral, डाऊनलोड केला असेल तर तुमचा खासगी डेटा धोक्यात

काही सायबर क्रिमिनल्सनी चुकीच्या हेतूने Battlegrouds Mobile India सारखी दिसणारी एक एपीके फाईल तयार केली आहे. इंटरनेटवर ही एपीके फाईल व्हायरल होत असून काही लोक ही फाईल शेअरही करत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 मे : चिनी कंपनीने तयार केलेल्या PUBG Mobile ची भारतात चांगलीच क्रेझ होती. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर हा गेम भारतात बॅन झाला. यामुळे अनेक युजर्सकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. आता PUBG Mobile परत तर येत नाही, पण पबजीची पेरेंट कंपनी भारतात एक नवा गेम Battlegrouds Mobile India लाँच करत आहे. हा गेम पबजी मोबाईलशी मिळता-जुळताच असेल, किंवा पबजीचंच हे एक वर्जन असल्याचं बोललं जात आहे. Krafton Inc ने दिलेल्या माहितीनुसार, युजर्सनी या गेमला पबजी मोबाईल गेम बोलू नये, कारण हा त्यापेक्षा वेगळा गेम असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. आता या गेमच्या बनावट-खोट्या लिंक शेअर केल्या जात आहेत. या गेमची एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर हा गेम मोबाईलमध्ये खेळता येऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

  (वाचा - Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक)

  पण, Battlegrouds Mobile India हा गेम प्ले स्टोरवर कधी उपलब्ध होणार याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीने केवळ यासाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू केलं जाईल असं सांगितलं आहे. त्यामुळे कंपनीने हा गेम अद्याप प्ले स्टोरवर उपलब्धच केला नसल्याने, एपीके फाईलद्वारे गेम इन्स्टॉल करण्याचा कोणताच प्रश्न येत नाही.

  (वाचा - Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस)

  परंतु, काही सायबर क्रिमिनल्सनी चुकीच्या हेतूने Battlegrouds Mobile India सारखी दिसणारी एक एपीके फाईल तयार केली आहे. इंटरनेटवर ही एपीके फाईल व्हायरल होत असून काही लोक ही फाईल शेअरही करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हॅकर्स या एपीके फाईलद्वारे युजरच्या डिव्हाईसला इंफेक्ट करू शकतात आणि फोन हॅकही होऊ शकतो.

  (वाचा - मोबाइलवर गेम खेळता? मग ही बातमी वाचाच)

  हॅकर्सने तयार केलेली एपीके फाईल, युजरच्या फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर, युजरचा पर्सनल डेटा हॅकर्सकडे होण्याची शक्यता आहे. पर्सनल डेटा त्यांच्याकडे गेल्यास, त्याचा चुकीचा वापरही केला जाऊ शकतो. त्यामुळे Battlegrouds Mobile India नावाची कोणतीही एपीके फाईल फोनमध्ये इन्स्टॉल करू नका.
  Published by:Karishma Bhurke
  First published: