फोन चार्जिंगला लावून VIDEO गेम खेळताना वीजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू

फोन चार्जिंगला लावून VIDEO गेम खेळताना वीजेचा धक्का बसून महिलेचा मृत्यू

यूयेनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला असून त्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मे: मोबाईल फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळत असताना विजेचा धक्का बसून 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना थायलंडमध्ये 6 मे रोजी घडली आहे. यूयेन सीनप्रसेर्ट (Yooyen Saenprasert) असं महिलेचं नाव आहे. यूयेन या ईशान्य थायलंडमधील (northeastern Thailand) उडोन थानी प्रांतातील (Udon Thani province) रहिवासी होत्या. यूयेनला दोन दिवसांपूर्वीच वाढदिवसानिमित्त तिच्या नवऱ्याने नवीन स्मार्ट फोन (smartphone) गिफ्ट दिला होता.

डेली मेलने (Daily Mail) दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचा मृतदेह तिच्या पतीला बेडवर जळालेल्या अवस्थेत आढळला होता. तिच्या हातावरील जखमा बघून तिचा मृत्यू इलेक्ट्रोक्युशनमुळे (Electrocution) झाल्याचे दिसून येत होते. तिच्या नवऱ्यानं या घटनेबद्दल माहिती दिली. प्रवैन सीनप्रसेर्ट म्हणाला, यूयेननं सायंकाळी तिचा सगळा वेळव्हिडिओ गेम (video game) खेळण्यात घालवला होता. त्यामुळे फोन चार्जिंगला (charging) लावल्यानंतर असं काही घडेल,असं तिला वाटलं नसेल.

वाचा: मोबाइल रिजार्चसह विमा कवच; फक्त 279 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल 4 लाखांचा Life Insurance

सायंकाळी जेव्हा प्रवैन फिशपॉन्डवर (fishpond) जाण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा यूयेन बेडवर पडून व्हिडीओ गेम खेळत होती आणि तिचा फोन चार्जिंगला लावला होता. चार्जिंग केबलघरातील मुख्य स्विचला लावली होता. रात्री तो घरी परतल्यानंतर यूयेन त्याला बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि तिच्या हातावर भाजल्याच्या खुणा होत्या. प्रवैनने तिला रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनीतिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार तासांपूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ‘मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हालचाल करत नव्हती, त्यामुळे काहीतरी वाईट घडलंय असा मला अंदाज आला होता, ’असं तिच्या नवऱ्यानं सांगितलं. मी तिला दोन दिवसांपुर्वीच वाढदिवसाला नवीन फोन घेऊन दिला होता. तिला व्हिडीओ गेम खेळायला खूप आवडायचं. मात्र, हा फोन तिचा असा घात करेल असं मला वाटलं नव्हतं, असं म्हणत प्रवैन भावूक झाला. या दाम्पत्याला मुलबाळ नसून दोघेच राहायचे.

मीडिया रिपोर्टनुसार, मृत महिलेच्या उजव्या हाताला जखम झाली होती. अशी जखम विजेचा धक्का बसल्यानंतर होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मृत्यूबद्दल कुटुंबीयांना कोणावरही संशय नाही. दरम्यान, यूयेनचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला असून त्यानंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे लेफ्टनंट कर्नल मंगकोम चोमकोट यांनी सांगितलं.

First published: May 13, 2021, 12:44 AM IST
Tags: gamemobile

ताज्या बातम्या