• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता Gmail अकाउंट हॅक होण्यापासून होईल बचाव; Google ची नवी सुविधा, असा होणार फायदा

आता Gmail अकाउंट हॅक होण्यापासून होईल बचाव; Google ची नवी सुविधा, असा होणार फायदा

गुगल (Google) जीमेल अधिक सुरक्षित करण्यासाठी नव्या सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 जुलै : जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात हॅकिंगचे प्रकार उघडकीस येत आहेत. अशात गुगल (Google) जीमेल अधिक सुरक्षित करण्यासाठी नव्या सुविधा घेऊन येत आहे. जीमेलमध्ये एक प्रमाणित ब्रँड लोगो, एक सुरक्षा सर्विस आहे जी पहिल्यांदा जुलैमध्ये घोषित करण्यात आली होती. आता येणाऱ्या आठवड्यात ही सर्विस सुरू होणार आहे. याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. Google नुसार, या फीचरमध्ये ब्रँड इंडिकेटर फॉर मेसेज आयडेंटिफिकेशन नावाच्या एका मानकाचा वापर केला गेला आहे, जो मेल अधिक सुरक्षित (Gmail Security) ठेवण्यास मदत करेल. कसं काम करेल ही सर्विस - नव्या सुविधेनुसार, एखाद्या संस्थेचा लोगो ईमेल पाठवल्यानंतर युजरच्या इनबॉक्समध्ये दिसेल. हे डोमेन आधारित संदेश प्रमाणीकरण, रिपोर्टिंग आणि DMARC नावाच्या एका तंत्राचा वापर करतं. जे फिशिंग (Phishing) मेल कमी करण्यासाठी मदत करतो. टेक जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, लोगो अशा कंपन्यांसाठी दिसतील जे आपल्या ईमेलला प्रमाणित करण्यासाठी सेंडर पॉलिसी फ्रेमवर्क (SMF) किंवा डोमेनच्या आयडेंटिफिकेशन मेलचा (DKIM) उपयोग करतात. SPF आणि DKIM ईमेल प्रमाणीकरण तंत्रज्ञान आहे, ज्याचा उपयोग स्पॅमरला नियंत्रित करण्यासाठी केला जातो. युजर्सकडून त्यांच्या ईमेलला स्कॅम रुपात निश्चित केलं गेल्यास, या तंत्राचा उपयोग करुन फसवणूक करणाऱ्यांना आळा घालता येईल.

  (वाचा - किती वेळा Password बदलणं योग्य? Google च्या सुंदर पिचईंनीच सांगितलं)

  फायदे - कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की ज्यावेळी हे प्रमाणित ईमेल सर्व प्रमाणिकता पास करतील, त्यावेळी जीमेल UIM मध्ये असलेल्या स्लॉटमध्ये Logo दिसण्यास (Authenticated Brand Logo) सुरू होईल. लोगो छोट्या सर्कुलर रुपात स्लॉटमध्ये दिसतील. यामुळे फिशिंग, हॅकिंगसारख्या प्रकारांना रोखण्यास मदत मिळेल.
  Published by:Karishma
  First published: