मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Drugs And Bollywood: ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंत WhatsApp Chat

Drugs And Bollywood: ड्रग्ज चौकशीच्या भीतीने बॉलिवूडकर डिलीट करतायंत WhatsApp Chat

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ड्रग्जच्या चौकशीच्या भीतीने अनेक बॉलिवूड कलाकार आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट कायमस्वरूपी डिलीट करत असल्याची माहिती मिळत आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ड्रग्जच्या चौकशीच्या भीतीने अनेक बॉलिवूड कलाकार आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट कायमस्वरूपी डिलीट करत असल्याची माहिती मिळत आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ड्रग्जच्या चौकशीच्या भीतीने अनेक बॉलिवूड कलाकार आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट कायमस्वरूपी डिलीट करत असल्याची माहिती मिळत आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सध्या फार गाजत आहे. त्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने याआधी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची (Bollywood) चौकशी केली होती. त्यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोन आणि सारा अली खान यांचा समावेश आहे. या सर्वांच्या चौकशीमध्ये WhatsApp Chat वरून त्यांनी ड्रग्जच्या संदर्भात केलेल्या संभाषणाचा आधार NCB कडून घेण्यात आला होता.

परंतु आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या ड्रग्जच्या (Bollywood drugs case) चौकशीच्या भीतीने अनेक बॉलिवूड कलाकार आपले व्हॉट्सअ‍ॅप चॅट कायमस्वरूपी डिलीट करत असल्याची (Bollywood celebrities are deleting WhatsApp chats) माहिती मिळत आहे. आता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणात चौकशी सुरू असताना ही बातमी समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक?

समोर आलेल्या या रिपोर्टमध्ये नेमके कोणते कलाकार आपले WhatsApp Chat डिलीट करत आहे, यासंदर्भात कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. परंतु सततच्या NCB च्या चौकशीमुळे आणि विशेषत: आर्यन खानच्या केसमुळे इतर बॉलिवूड कलाकरांनी धसका घेतला आहे. याआधी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणावेळी काही कलाकारांच्या WhatsApp Chats ची चौकशी NCB कडून करण्यात आली होती.

WhatsApp प्रायव्हेट असताना Ananya-Aryan चं चॅट NCB च्या हाती कसं लागलं?

त्यानंतर राज कुंद्रा यांच्या पोर्नोग्राफी केसमध्येही व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा आधार घेण्यात आला होता. या सर्व प्रकरणातून मोठे खुलासे करण्यात आले होते. त्यामुळे काही कलाकार आपले चॅट्स कायमस्वरूपी डिलीट करत असल्याचं बोललं जात आहे. परंतु ही चॅट कायमस्वरूपी डिलीट होतात का? असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. रिपोर्टमध्ये याविषयीही माहिती देण्यात आली आहे.

Spotify App वर आता गाणी ऐकण्यासह Video ही पाहता येणार; पाहा काय आहे प्रोसेस

एखाद्या यूजरने व्हॉट्सअ‍ॅप चॅट कायमस्वरूपी जरी डिलीट केली तरी तो डाटा रिसायकल बिनमध्ये जमा होतो आणि तो काही महिन्यांनी रिकव्हर करता येतो. त्यामुळे चॅट काहीसाठी स्मार्टफोनमधून डिलीट होतात. परंतु एखाद्या आरोपीची चौकशी सुरू असताना पोलिसांना कोर्टाच्या परवानगीने संबंधित व्यक्तीचे चॅट्स परत मिळवण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे डिलीट केलेले चॅटसुद्धा गरज पडली तर पोलीस रिकव्हर करू शकतात.

First published:

Tags: Aryan khan, Bollywood actress, Bollywood News, Drugs, WhatsApp chats