मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Spotify App वर आता गाणी ऐकण्यासह Video ही पाहता येणार; पाहा काय आहे प्रोसेस

Spotify App वर आता गाणी ऐकण्यासह Video ही पाहता येणार; पाहा काय आहे प्रोसेस

Spotify App मध्ये एक महत्त्वाचं (Videos On Spotify) फीचर आलं आहे. त्यामुळं आता लोकांना Spotify App वर एकाचवेळी Audio Songs आणि Video एकत्रच पाहता येणार आहे.

Spotify App मध्ये एक महत्त्वाचं (Videos On Spotify) फीचर आलं आहे. त्यामुळं आता लोकांना Spotify App वर एकाचवेळी Audio Songs आणि Video एकत्रच पाहता येणार आहे.

Spotify App मध्ये एक महत्त्वाचं (Videos On Spotify) फीचर आलं आहे. त्यामुळं आता लोकांना Spotify App वर एकाचवेळी Audio Songs आणि Video एकत्रच पाहता येणार आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सध्याच्या धावपळीच्या काळात लोकांना व्यस्त शेड्यूलमध्ये सदाबहार गाणी ऐकण्यासाठी Spotify App  फायदेशीर ठरत आहे. त्यामुळेच या अ‍ॅपची लोकप्रियता कमी काळातच वाढली आहे. अनेक जण व्यायाम करताना, प्रवास करतानाही (listening songs On Spotify) गाणी ऐकण्यासाठी Spotify अ‍ॅपचा वापर करतात. आता या App मध्ये एक जबरदस्त (Videos On Spotify) फीचर आलं आहे. या नव्या फीचरमुळे आता लोकांना Spotify App वर Audio Songs आणि Video एकत्रच पाहता येणार आहे.

Spotify कंपनीने याविषयी घोषणा करताना सांगितलं, की आता लोकांना App वर गाणी ऐकण्यासह Video ही पाहता येणार आहे. त्याचबरोबर आता Podcast ची आवड असणाऱ्या लोकांनाही Spotify वर स्वत:चं Podcast रेकॉर्ड करता येईल. त्यासाठी युजर्सला एक स्वतंत्र पर्याय देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. Spotify मध्ये भविष्यात व्हिडीओही पाहता येणार आहे.

ओला कंपनीनं केलं इलेक्ट्रि्क हायपर चार्जर लॉन्च; स्कूटरला 18 मिनिटांत करा चार्ज

पाहा काय प्रोसेस?

जर तुम्हाला Spotify वर Video पाहायचे आहेत तर त्यासाठी जो शो तुम्हाला पाहायचा आहे त्या पेजला नेविगेट करावं लागेल. त्यानंतर प्ले टू स्टार्ट द ऐपिसोड या ऑप्शनवर क्लिक करून हे व्हिडीओ पाहता येतील. त्याचबरोबर युजर्सना या प्रोग्राममध्ये Audio आणि Video चा ही पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सला Spotify App वरील या सुविधेचा फायदा होईल.

सहसा यूजर्सला जेव्हा व्हिडीओ पाहायचे असतात त्यावेळी त्यांना यूट्यूबवर जावं लागतं. परंतु आता ही सुविधा Spotify अ‍ॅपवर उपलब्ध होत असल्याने यूट्यूबच्या युजर्समध्ये कमी येईल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑपरेटिंग सिस्टम iOS14 वरून अ‍ॅपल आणि फेसबुक भिडले

त्याशिवाय या अ‍ॅपवर लोकांना Video पाहण्याबरोबर स्वत:चे Video ही Upload करता येणार आहे. Spotify च्या सब्सक्रिप्शननंतर लोकांना त्यांच्या चॅनलला मॉनेटाइजही करता येईल. त्यामुळे युजर्सला पैसे कमावण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे. परंतु कंपनीने किती पॉडकास्ट लॉन्च केले जातील याविषयी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र या वर्षाअखेरीस हजारो लोकांना याचा लाभ घेता येईल, असं म्हटलं जात आहे.

First published:

Tags: Apps, Song, Videos