जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp प्रायव्हेट असताना Ananya Pandey-Aryan Khan चं चॅट NCB च्या हाती कसं लागलं?

WhatsApp प्रायव्हेट असताना Ananya Pandey-Aryan Khan चं चॅट NCB च्या हाती कसं लागलं?

WhatsApp प्रायव्हेट असताना Ananya Pandey-Aryan Khan चं चॅट NCB च्या हाती कसं लागलं?

ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्यन खान आणि अनन्या पांडेचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट एनसीबीच्या हाती लागल्यामुळं तिची चौकशी झाल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र यादरम्यान एक नवीन मुद्दा डोकं वर काढत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 23 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान (Aryan Khan Drug Case) ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणाची चौकशी करताना अभिनेत्री अनन्या पांडेचं (Ananya Pandey in Drug Case) नावदेखील समोर आलं असून, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो अर्थात एनसीबीने (NCB) तिची देखील चौकशी केली आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान आर्यन खान आणि अनन्या पांडेचं व्हॉट्सअ‍ॅप चॅट एनसीबीच्या हाती लागल्यामुळं तिची चौकशी झाल्याचं सांगितलं गेलं आहे. मात्र यादरम्यान एक नवीन  मुद्दा डोकं वर काढत आहे, ते म्हणजे व्हॅाट्सअ‍ॅप चॅट एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड (Whatsapp End-to-end encrypted) असल्याचं म्हटलं जातं, तर आर्यन आणि अनन्याचं चॅट लीक झालंच कसं? गेल्या दीड वर्षाच्या काळात अनेक सेलेब्रिटींचे चॅट्स लीक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळं व्हॅाट्सअ‍ॅपच्या गोपनीयतेबद्दल अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत; मात्र एंड-टू-एंड एन्क्रिप्शन तंत्रज्ञान पूर्णतः सुरक्षित असून, ही चॅट्स लीक होण्याचं कारण वेगळंच आहे. वाचा- या बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आज-उद्या मिळणार नाहीत बँक सर्व्हिस विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मेसेजिंग अ‍ॅप्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय मानलं जातं. जगभरातले अब्जावधी नागरिक याचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपची सुरक्षा आणि प्रायव्हसी फीचर्स (Privacy Features) हे दोन घटक त्याच्या लोकप्रियतेचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं. व्हॉट्सअ‍ॅपवरील प्रत्येक युझरचे चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याचा दावा कंपनी करते. एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड (End-to-End Encrypted) असणं म्हणजे चॅट ज्यांच्यामध्ये झालंय, त्या दोन व्यक्तींव्यतिरिक्त तिसरी कोणीही व्यक्ती हे मेसेज वाचू शकत नाही. स्वत: व्हॉट्सअ‍ॅप कंपनीदेखील हे चॅट वाचू शकत नाही. तरीही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लीक झाल्याचे अनेक प्रकार जगभरात समोर आले आहेत. चॅट लीक होतं म्हणजे नेमकं काय होतं, हे आपण जाणून घेऊ या. एंड-टू-एंड इन्क्रिप्शन तंत्रज्ञानामुळे चॅट लीक होणं ही अशक्य गोष्ट आहे. माध्यमांमध्ये ज्या चॅट्स लीक होण्याच्या बातम्या येतात त्यामध्ये तपास यंत्रणांतल्या अधिकाऱ्यांनी युझरचं चॅट अॅक्सेस केलेलं असतं. म्हणजेच तपास यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या आरोपींचे फोन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर फोन अनलॉक करून त्या फोनवरच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जाऊन चॅट्स पाहतात. त्यामुळे त्या आरोपीने कोणाशी आणि काय संभाषण केलंय, हे थेटच समजतं. याचाच अर्थ असा होतो, की युझरचं अकाउंट हॅक वगैरे करून चॅट लीक करता येत नाही. अमेरिकेसारख्या देशांमध्ये एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तीची खासगी चॅट्स मिळवायची असतील, तर वॉरंटची आवश्यकता असते. वॉरंट असेल तरच ते चॅट पाहू शकतात; मात्र भारतात याबाबत अशा प्रकारचे कायदे नाहीत. आरोपींचा फोन तपास अधिकाऱ्यांच्या हातात असेल, तर त्यातून अगदी सहजपणे चॅट मिळवता येतात. वाचा- Revolt ची ही इलेक्ट्रीक बाईक लॉन्च; 5 तासांच्या चार्जिंगवर चालणार 150KM अलीकडेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सचा बॅकअप एनक्रिप्टेड नव्हता, तोपर्यंत फोन अनलॉक करून आणि कम्प्यूटरवर क्लोनिंग करून चॅट्स मिळवता येत होती. आवश्यक असल्यास अधिकारी न्यायालयाच्या आदेशाने गुगल (Google) किंवा अ‍ॅपल (Apple) या कंपन्यांशी देखील संपर्क साधू शकतात. माहितीची मागणी करणारी यंत्रणा अधिकृत आहे याची खात्री करून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून व्हॉट्सअॅपदेखील एखाद्या अकाउंटबद्दल बेसिक माहिती देऊ शकतं. गेल्या दीड वर्षात बॉलिवुडमधल्या अनेक स्टार्सचं चॅट लीक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोण, रकुलप्रीतसिंह याच्यासह अनेक कलाकारांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) चौकशीसाठी बोलावलं होतं. आता पुन्हा आर्यन खानच्या प्रकरणात अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलवलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड इन्क्रिप्शन फीचरमध्ये कोणतीही समस्या नाही; पण संशयास्पद किंवा गैरकृत्यं केली असतील आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागला, तर मात्र कोणाचीही चॅट्स मिळवली जाऊ शकतात, ही गोष्टही तितकीच खरी आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात