मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, जबरदस्त कॅमेरासह मिळेल 512 GB पर्यंत स्टोरेज; काय आहे किंमत

iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, जबरदस्त कॅमेरासह मिळेल 512 GB पर्यंत स्टोरेज; काय आहे किंमत

अनेक अपडेट्ससह iPhone 13 mini एका एन्ट्री लेवल फोन रुपात समोर आला आहे. iPhone 13 mini हा फोन iPhone 13 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : Apple च्या नव्या iPhone ची मागील अनेक काळापासून चर्चा होती. अखेर Apple ने अधिकृतपणे आपली iPhone 13 सीरिज लाँच केली आहे. सीरिजमध्ये कंपनीने iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 pro आणि iPhone 13 pro max हे फोन लाँच केले आहेत. अनेक अपडेट्ससह iPhone 13 mini एका एन्ट्री लेवल फोन रुपात समोर आला आहे. iPhone 13 mini हा फोन iPhone 13 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 69,900 रुपये आहे. भारतात iPhone 13 mini ची किंमत 129GB बेस स्टोरेज ऑप्शनसाठी 69,900 रुपये सुरुवाती किमतीपासून सुरू होते. तर 256GB ची किंमत 79,900 रुपये आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची कीमत 99,900 रुपये आहे. डिझाईनच्या तुलनेत iPhone 12 mini च्या तुलनेत iPhone 13 mini मध्ये अधिक अंतर नाही. केवळ 20% छोटा नॉच आणि कॅमेरा मॉड्यूलचं अलाइनमेंट वेगळं आहे. त्यामुळे iPhone 13 mini दिसताना iPhone 12 mini सारखाच दिसतो. iPhone 13 mini मध्ये 1080 x 2340 पिक्सल रेजोलूशनसह 5.4 इंची रेटिना डिस्प्ले असून हा डिस्प्ले OLED पॅनलवाला आहे. फोन iOS 15 वर काम करतो. हा iPhone कंपनीने 128GB, 256GB आणि 512GB वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला.

Apple event : जुनी बाटली नवी दारू, अखेर iphone 13 लाँच, काय आहे नवं?

iPhone 13 कॅमेरा - iPhone 13 mini ला मोठ्या अपर्चरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये f/1.8 अपर्चरवाला 12 मेगापिक्सल प्राइमरी कॅमरा आणि f/1.8 अपर्चरवाला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमरा देण्यात आला आहे. अल्ट्रा-वाइड लेन्समध्ये ऑटोफोकसही आहे. सेल्फीसाठी या फोनच्या छोट्या नॉचमध्ये f/2.2 अपर्चर वाला 12 मेगापिक्सल कॅमरा आहे. Pink, Blue, Midnight, Starlight आणि Red कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. भारतात iPhone 13 mini ची विक्री 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 17 सप्टेंबर संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला जाईल.
First published:

Tags: Apple, Iphone, Smartphone

पुढील बातम्या