नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी: इन्स्टाग्राम
(Instagram) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करत आहे. Meta च्या मालकीची कंपनी Instagram ने भारतात टेक अ ब्रेक
(Take a Break) फीचर सुरू केलं आहे. हे फीचर भारतासह सर्व देशांमध्ये सुरू करण्यात आलं आहे. टेक अ ब्रेक अर्थात नावाप्रमाणे हे फीचर युजर्सला इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेण्यासाठी सांगेल. तसंच App पासून एकदा ब्रेक घेतल्यानंतर त्या पुढील ब्रेक घेण्यासाठीही रिमाइंडर सेट करण्याचा सल्लाही देईल.
तरुणांचं आरोग्य, त्यांचं हीत महत्त्वाचं आहे. इन्स्टाग्रामवर अतिरिक्त वेळ घालवणाऱ्या युजर्ससाठी, तरुणांसाठी हे फीचर अतिशय महत्त्वाचं असल्याचं इन्स्टाग्राम पब्लिक पॉलिसी मॅनेजर नताशा जोगने म्हटलं. तसंच तरुण युजर्ससाठी इन्स्टाग्रामवरील अनुभव अधिक चांगला करण्यासाठी टेक अ ब्रेक फीचर लाँच केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. Instagram वर सुरक्षित आणि उपयुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काम करण्याचं आमचं ध्येय आहे, जेणेकरुन तरुणाई त्यांच्या आवडीनुसार App चा वापर करू शकतील.
कसं काम करेल Take A Break फीचर -
ज्यावेळी युजर इन्स्टाग्रामचा अधिक वापर करेल त्यावेळी टेक अ ब्रेक फीचर पॉप-अप होईल. या फीचरद्वारे युजर्सला इन्स्टाग्रामवरुन ब्रेक घेण्याचं सांगितलं जाईल. तसंच पुढील ब्रेक घेण्यासाठीही रिमाइंडर सेट करण्याचं सांगितलं जाईल. यासाठी रिमाइंडर चालू करुन नोटिफिकेशन पाठवलं जाईल. 'Take a Break' नावाचं हे फीचर युजर्सला फोटो शेअरिंग App इन्स्टाग्रामच्या वापरादरम्यान नियमित ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहित करेल.
मागील काही दिवसांपूर्वी Instagram मुळे तरुणांवर, त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे आरोप झाले होते. इन्स्टाग्राम तरुणांसाठी हानिकारक असल्याचं म्हटलं गेलं होतं. एका अमेरिकी व्हिसलब्लोअर फ्रांसेस हॉगेन यांनी खुलासा केला, की सोशल मीडिया App तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहेत. त्यानंतर आता इन्स्टाग्रामकडून ही पावलं उचचली जात आहेत.
मागील काही महिन्यांपासून या फीचरवर काम सुरू होतं. फीचर टेस्टिंगमध्ये होतं. परंतु आता हे फीचर भारतात लाँच करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.