मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Android युजर्स सावधान; तुमच्या फोनची स्क्रिन रेकॉर्ड करतंय हे App, लगेच करा डिलीट

Android युजर्स सावधान; तुमच्या फोनची स्क्रिन रेकॉर्ड करतंय हे App, लगेच करा डिलीट

अँड्रॉईडमध्ये एक धोकादायक मालवेअर (Malware) आढळला असून तो डिव्हाईसमध्ये डेटा चोरी करू शकतो. या मालवेअरला Vultur असं नाव देण्यात आलं आहे, जो तुमच्या स्क्रिनवर दिसणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करतो.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : तुम्ही अँड्रॉईड युजर (Android User) असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सिक्योरिटी एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, अँड्रॉईडमध्ये एक धोकादायक मालवेअर (Malware) आढळला असून तो डिव्हाईसमध्ये डेटा चोरी करू शकतो. या मालवेअरला Vultur असं नाव देण्यात आलं आहे, जो तुमच्या स्क्रिनवर दिसणारी प्रत्येक माहिती रेकॉर्ड करतो. लॉगइन, पासवर्ड, इंटरनेट हिस्ट्री, बँक डिटेल्स, मेसेज, सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी अशा सर्व गोष्टी हा मालवेअर रेकॉर्ड करू शकतो.

मिळालेल्या रिपोर्टनुसार, Vultur एक बँकिंग ट्रोजन (Banking Trojan) म्हणजेच बँक डिटेल्स चोरी करणारा मालवेअर आहे. परंतु हा इतर बँकिंग ट्रोजनहून अतिशय वेगळा आहे. इतर मालवेअर युजर्सकडून बनावट वेबसाईटद्वारे अकाउंट डिटेल्स भरुन घेतात आणि नंतर चोरी करतात.

तुमचा Facebook डेटा लीक झालाय का? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

परंतु Vultur मालवेअर थेट युजर्सच्या डिव्हाईस स्क्रिनला रेकॉर्ड (Screen Recording) करुन अकाउंटची माहिती चोरी करतो. त्यामुळे युजरने अधिकृत साईटवर लॉगइन केलं, तरी डिटेल्स चोरी होऊ शकतात.

Alert! चुकूनही रिसिव्ह करू नका हा कॉल, अन्यथा बसेल मोठा फटका

मोबाईल सिक्योरिटी वेबसाईट Threat Fabric च्या तज्ज्ञांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं, की हा मालवेअर यावर्षी मार्चमध्ये समोर आला. हा मालवेअर गुगल प्ले स्टोरवर (Google Play Store) असलेल्या एका अ‍ॅपद्वारे पसरला आहे, जो आतापर्यंत अनेकांकडून डाउनलोडही करण्यात आला आहे. Protection Guard असं या अ‍ॅपचं नाव असून Google Play Store वरुन हे अ‍ॅप हटवण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Android, Malware, Tech news