मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Alert! चुकूनही रिसिव्ह करू नका हा कॉल, अन्यथा बसेल मोठा फटका

Alert! चुकूनही रिसिव्ह करू नका हा कॉल, अन्यथा बसेल मोठा फटका

‘No Number’ कॉल आला, तर तो फसवणुकीचा कॉल ठरू शकतो. अशा कॉलला प्रतिसाद न देणं आणि लगेच DoT च्या टोल फ्री नंबरवर कॉल करणं आवश्यक आहे.

‘No Number’ कॉल आला, तर तो फसवणुकीचा कॉल ठरू शकतो. अशा कॉलला प्रतिसाद न देणं आणि लगेच DoT च्या टोल फ्री नंबरवर कॉल करणं आवश्यक आहे.

‘No Number’ कॉल आला, तर तो फसवणुकीचा कॉल ठरू शकतो. अशा कॉलला प्रतिसाद न देणं आणि लगेच DoT च्या टोल फ्री नंबरवर कॉल करणं आवश्यक आहे.

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेकांना फसवणूक करणारे कॉल येतात आणि अनेकदा याला बळी पडून लोक त्यांचं मोठं नुकसान करून घेतात. हॅकर्स (Hackers) लोकांना कॉलद्वारे जाळ्यात अडकवतात. ऑनलाईन फ्रॉडसाठी फ्रॉडस्टर्स अनेक नवीन मार्गांचा वापर करतात. अनेकदा परदेशातून वेगळ्याच क्रमांकावरून कॉल येत असतात. आता तर 'नो नंबर (No Number)' म्हणजेच आपल्याला कॉल येतो, पण नंबर दिसत नाही, असाही कॉलचा प्रकार समोर आला आहे. आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर नंबरऐवजी 'No Caller ID' असं फक्त दिसून येतं. नागरिकांची याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे. नागरिकांनी फसवणुकीच्या नवीन प्रकाराविषयी सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. या

सध्या अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याविषयी भारतीय दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications DoT) नागरिकांना सतर्क केलं आहे. सर्व मोबाईल युजर्सना (Mobile Users) DoT कडून एक मेसेज (Message) पाठवण्यात आला आहे. त्या मेसेजमध्ये असं लिहिलं आहे, जर आंतरराष्ट्रीय नंबरवरून भारतीय क्रमांकावर कॉल (International Call) आला आणि तुमच्या डिस्प्लेवर भारतातील क्रमांक दिसला किंवा कुठलाच क्रमांक दिसला नाही (No Number Display) तर त्वरित DoT च्या टोल फ्री नंबर 1800110420/1963 वर संपर्क साधावा.

तुमचा Facebook डेटा लीक झालाय का? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

‘No Number’ कॉल आला, तर तो फसवणुकीचा कॉल ठरू शकतो. अशा कॉलला प्रतिसाद न देणं आणि लगेच DoT च्या टोल फ्री नंबरवर कॉल करणं आवश्यक आहे. टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) सुद्धा अशा कॉलपासून सावध राहण्याच्या सूचना देत आहेत. जिओ (Jio), वोडाफोन- आयडिया (Vodafone idea) आणि एअरटेलकडून (Airtel) युजर्सला सतर्क करण्यात आलं आहे. अशा नंबरवरून आलेल्या कोणत्याही कॉल किंवा मेसेजवर अजिबात विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

प्रामुख्याने अशा फसवणुकीमध्ये वेगवेगळ्या देशाच्या कोडद्वारे (Country Code) कॉल केले जातात. +92, +375 अशा Country Code द्वारे जर कॉल आला, तर अशा कॉलला अजिबात प्रतिसाद देऊ नका. असे कॉल करून आपल्याला लॉटरी (Lottery) किंवा बक्षीस जिंकल्याच सांगण्यात येतं. यातून हॅकर्स आपली वैयक्तिक माहिती मिळवतात. तसंच ते बक्षीस मिळवण्यासाठी कमिशन द्यावं लागेल असंही सांगतात. अशा प्रकारची फसवणूक केवळ कॉलद्वारेच नाही तर एसएमएसद्वारे सुद्धा केली जाते. दूरसंचार विभाग आणि टेलिकॉम कंपन्या यासंदर्भात नागरिकांना सतत सूचना देत आहेत.

WhatsApp Alert!हॅकर्स असं पाहू शकतात तुमचं चॅट; सुरक्षिततेसाठी काय आहे पर्याय

नागरिकांनी आपलं नुकसान टाळण्यासाठी अशा कॉलपासून दूर राहावं. कोणत्याही परदेशातील नंबरवरून मिस्ड कॉल (Missed Call) आल्यास त्यावर परत कॉल करू नये. या पुढे ऑनलाइन फसवणुकीविषयी सर्वांनी जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हॅकर्स नवनवीन पद्धतीच्या वापर करत आहेत.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Tech news