मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Android Smartphone वापरता? आजपासून हे Apps बंद, Google ची नवी पॉलिसी

Android Smartphone वापरता? आजपासून हे Apps बंद, Google ची नवी पॉलिसी

कोणत्याही थर्ड पार्टी Call Recording App द्वारे तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग Apps बंद केले जातील (Call Recording) असं गुगलने म्हटलं आहे.

कोणत्याही थर्ड पार्टी Call Recording App द्वारे तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग Apps बंद केले जातील (Call Recording) असं गुगलने म्हटलं आहे.

कोणत्याही थर्ड पार्टी Call Recording App द्वारे तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग Apps बंद केले जातील (Call Recording) असं गुगलने म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 11 मे : गुगल प्ले स्टोर पॉलिसीतील बदलांनंतर 11 मे आजपासून कॉल रेकॉर्डिंग App बंद झाले (Google Play Store Call Recording App) आहेत. ट्रूकॉलरसह इतर अनेक Apps चे युजर्सदेखील आपल्या अँड्रॉइड फोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत. म्हणजेच कोणत्याही थर्ड पार्टी Call Recording App द्वारे तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही. गुगलने याबाबत आधीच सूचना दिली आहे. त्यानुसार आजपासून यात बदल होत असे Apps बंद करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव कॉल रेकॉर्डिंग Apps बंद केले जातील (Call Recording) असं गुगलने म्हटलं आहे. Call Recording Apps अनेक परमिशन घेतात ज्याचा अनेक डेव्हलपर्सकडून चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्याशिवाय Call Recording Apps बाबत वेगवेगळ्या देशात वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे कंपनी यात बदल करत आहे. Google च्या नव्या पॉलिसीमुळे कॉल रेकॉर्डिंग Apps पूर्णपणे बंद केले जातील. तसंच Truecaller नेही आता कॉल रेकॉर्डिंग केलं जाऊ शकत नसल्याचं कन्फर्म केलं आहे. पण फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगसाठी दिलेले फंक्शन्स काम करतील. जर तुमच्या फोनमध्ये आधीच इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग App आहे, तर ते चालू शकेल. परंतु गुगलवरील कोणतंही App काम करणार नाही.

नवी प्ले स्टोअर पॉलिसी -

मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिसीनुसार, App डेव्हलपर्सला कॉल रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी एपीआयची सुविधा मिळणार नाही आणि ही सुविधा बंद झाल्यास App रेकॉर्डिंगचं काम करू शकणार नाही. नव्या प्ले स्टोअर पॉलिसीनुसार, रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी API ची सुविधा मिळणार नाही. ही सुविधा बंद झाल्यास ट्रूकॉलर, ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डरसह अनेक रेकॉर्डिंग App काम करणार नाहीत.

हे वाचा - सरकारकडून Driving License नियमांत मोठा बदल, 1 जुलैपासून लागू होणार नवा नियम

याआधी सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने अँड्रॉइड 10 सह कॉल रेकॉर्डिंग फीचर हटवलं होतं. अँड्रॉइड 11 सह एक्सेसिबिलिटी API फीचर आणलं. या फीचरचा वापर करुन डेव्हलपर्सने कॉल रेकॉर्डिंग App पुन्हा लाँच केले होते. परंतु आता नव्या पॉलिसीमुळे हे वापरता येणार नाही.

गुगल आपली पॉलिसी बदलत आहे. या बदलांमध्ये थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग App बंद होतील. गुगलची नवी पॉलिसी 11 मेपासून लागू होणार आहे. नव्या धोरणानुसार, प्ले स्टोअरवर (Google Play Store Call Recording App) असलेले कॉल रेकॉर्डिंग App निष्क्रिय होतील. अँड्रॉइड फोनवर तुम्ही कॉल रेकॉर्डिंगसाठी या App चा वापर करू शकणार नाही.

First published:

Tags: Android, Google, Smartphone, Tech news