मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

प्रायव्हेसीची चिंता सोडा; आता येतंय Android चं नेक्स्ट व्हर्जन

प्रायव्हेसीची चिंता सोडा; आता येतंय Android चं नेक्स्ट व्हर्जन

Google या वर्षाच्या अखेरीस Android 12 लाँच करू शकतो. यामध्ये काही वेगळेपण दिसण्याची शक्यता आहे.

Google या वर्षाच्या अखेरीस Android 12 लाँच करू शकतो. यामध्ये काही वेगळेपण दिसण्याची शक्यता आहे.

Google या वर्षाच्या अखेरीस Android 12 लाँच करू शकतो. यामध्ये काही वेगळेपण दिसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : गुगल यंदा अँड्रॉइड 12 (Android 12) हे ऑपरेटिंग सिस्टीमचं नवीन व्हर्जन दाखल करणार आहे. दर वर्षी गुगल या ऑपरेटिंग सिस्टीमचं नवीन व्हर्जन दाखल करते. गेल्या वर्षी कंपनीनं अँड्रॉइडचं 11 वं व्हर्जन दाखल केलं होतं. त्यात आधीच्या व्हर्जनपेक्षा फार सुधारणा नव्हत्या, मात्र अँड्रॉइड 12 कडून (Android 12) युझर्सना मोठ्या अपेक्षा आहेत. या नव्या अँड्रॉइड 12 मध्ये नोटीफिकेशन्समध्ये बदल दिसून येईल, तसंच आणखीही काही नवीन सुधारणा येतील अशी अपेक्षा आहे.

गुगल (Google) या वर्षीच्या अखेरीपर्यंत अँड्रॉइड 12 (Android 12) दाखल करण्याची शक्यता आहे. अँड्रॉइड सेन्ट्रलच्या  (Android Central) अहवालानुसार, कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) गुगलचे कर्मचारी घरातून काम करत आहेत, त्यामुळे या नव्या व्हर्जनला थोडा उशीर होत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये अँड्रॉइडचं नवीन व्हर्जन दाखल होण्याची शक्यता आहे.

स्टेबल रिलीजआधी गुगल डेव्हलपर प्रीव्ह्यू आणि शेवटी बीटा व्हर्जन दाखल करते. अँड्रॉइड 10 (Android 10) आणि अँड्रॉइड 11 (Android 11) चे प्रीव्ह्यू फेब्रुवारीमध्ये दाखल झाले होते. आता अँड्रॉइड 12 प्रीव्ह्यू फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, अँड्रॉइड 12 चा पहिला प्रीव्ह्यू 17 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी किंवा 3, 10 किंवा 17 मार्चला दाखल होण्याची शक्यता आहे.

हे वाचा - iPhone वर बंपर ऑफर; तब्बल 18000 रुपयांच्या बचतीवर खरेदी करता येणार 'हा' फोन

अँड्रॉइड 12 चे फोटो लिक झाले आहेत, त्यानुसार या ऑपरेटिंग सिस्टीमच्या इंटरफेसमध्ये (OS interface) अनेक बदल करण्यात आले आहेत. नोटीफिकेशन पॅनल, राउंडेड कॉर्नर, प्रायव्हसी फीचर आणि व्हीजेट सेक्शन यात अनेक बदल दिसून येत आहेत.

नोटीफिकेशन पॅनल गोल आकारात दाखवण्यात आलं आहे.

सुरक्षिततेच्या (Security) दृष्टीनं यात काही नवीन फीचर्स बघायला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये अॅप परमिशन्सचाही समावेश असेल. नोटीफिकेशन स्क्रीनवर 6 टाईल्सच्या ऐवजी 4 शॉर्टकट कीज असतील.

फोनच्या डाव्या बाजूला तारीख आणि वेळ दिसेल.

उजव्या बाजूला वरती नवे आयकॉन्स असतील.

बॅकग्राउंडला ट्रान्स्परन्सीच्या ऐवजी ओपेक लाईट दिसेल.

रंगाच्या संकल्पनेनुसार यात बदल दिसतील, त्यात डार्क मोडही असू शकतो.

हे वाचा -   iPhone वर बंपर ऑफर; तब्बल 18000 रुपयांच्या बचतीवर खरेदी करता येणार 'हा' फोन

गेल्या अनेक वर्षात गुगलच्या इंटरफेसमध्ये मोठे बदल दिसून आलेले नाहीत. यंदा अँड्रॉइड 12 मध्ये काही वेगळेपण दिसण्याची शक्यता आहे. गुगलचे अँड्रॉइड बीटा व्हर्जन इन्स्टॉल करणं सोपं आहे. अँड्रॉइड बीटा प्रोग्रेम वेबसाइटवर ऑप्ट -इन करावा लागेल. नंतर ते आपोआप अपडेट होईल.

First published:

Tags: Android, Google, Mobile Phone, Security, Smartphone