• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • iPhone वर बंपर ऑफर; तब्बल 18000 रुपयांच्या बचतीवर खरेदी करता येणार 'हा' फोन

iPhone वर बंपर ऑफर; तब्बल 18000 रुपयांच्या बचतीवर खरेदी करता येणार 'हा' फोन

Apple ने काही दिवसांपूर्वी iPhone 12 सीरिजचे 4 नवे फोन iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max लाँच केले होते. यात iPhone 12 Mini सीरिज सर्वात स्वस्त फोन आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : भारतात iPhone ची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशात कंपनी आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स जाहीर करत करत असते. सध्या कंपनीकडून Apple iPhone 12 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहक या फोनवर 18000 रुपयांची बचत करू शकणार आहेत. Apple ने काही दिवसांपूर्वी iPhone 12 सीरिजचे 4 नवे फोन iPhone 12, iPhone 12 Pro, iPhone 12 Mini आणि iPhone 12 Pro Max लाँच केले होते. यात iPhone 12 Mini सीरिज सर्वात स्वस्त फोन आहे. या ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना HDFC कार्डचा वापर करावा लागेल. ज्याद्वारे 6000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास 9000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. त्याशिवाय 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनसही मिळतो आहे. असा एकूण 18000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. संपूर्ण डिस्काउंटनंतर iPhone 12 mini ची किंमत 51,900 रुपये इतकी होते. जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही चांगली ऑफर ठरू शकते.

  (वाचा - Samsung Days Sale: स्मार्टफोन आणि टॅबलेट्सवर बंपर ऑफर्स, कॅशबॅकही मिळणार)

  iPhone 12 Mini फीचर्स - - 5.4 इंची सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले - ड्यूल-सिम सपोर्ट - नॅनो आणि ई-सिमचा वापर केला जाऊ शकतो. - iOS 14 सॉफ्टवेअर - A14 बायोनिक चिप - 64GB, 128GB, आणि 256GB तीन स्टोरेज वेरिएंट

  (वाचा - 20 हजारांचा 5G स्मार्टफोन मिळतोय 13,999 रुपयांत; पाहा काय आहे ही जबरदस्त ऑफर)

  कॅमेरा सेटअप - iPhone 12 Mini मध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आहे, तर दुसरा 12 मेगापिक्सल वाईड सेंसर आहे. यात नाइट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, 4K नाइट मोड, 4K Dollby Vision HDR रिकॉर्डिंग सारखे फीचर्स आहेत. फोनच्या फ्रंटला 12 मेगापिक्सल ट्रू डेप्थ सेंसर देण्यात आला आहे, जो नाइट मोड आणि 4K Dollby Vision HDR सपोर्टसह आहे.
  Published by:Karishma
  First published: