नवी दिल्ली, 5 डिसेंबर : ई-कॉमर्स कंपनी Amazon वरुन अनेक जण Online Shopping करतात. पण या वेबसाइटवर तुम्ही खरेदी करत असलेल्या वस्तू आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. Amazon च्या Secret Website वरुन ही खरेदी करता येऊ शकते. या या सिक्रेट वेबसाइटवर अर्ध्याहून कमी किंमतीत सामान उपलब्ध आहे. इथे 7 हजार रुपयांत मिळणाऱ्या वस्तूची किंमत केवळ 2 हजार रुपये आहे. काय आहे सिक्रेट वेबसाइट - लॉकडाउन काळात अनेक दुकानं बंद होती. त्याकाळात अनेकांकडून Amazon किंवा इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन खरेदी केली जात होती. इथे उत्पादनांवर ऑफर असतात. मात्र Amazon च्या सिक्रेट वेबसाइटवर तुम्ही रिटर्न आलेल्या वस्तू किंवा हलक्या स्वरुपात खराब झालेल्या उत्पादनांची खरेदी करता येते.
डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ पाठवा अन् विनामूल्य तज्ज्ञांचा सल्ला
moneysavirngexpert.com नुसार, एका युजरने सांगितलं, की ‘मी प्रेशर वॉशर खरेदीसाठी अॅमेझॉन वेयरहाउसवर पाहिलं. एका विशेष मॉडेलची इतर वेबसाइटवर किंमत जवळपास 20 हजार रुपयांहून अधिक होती. परंतु हेच मॉडेल मला अॅमेझॉन वेयरहाउसवर केवळ 13 हजार रुपयांत मिळालं. हे डील आवडल्यानंतर मी अनेक वस्तू या सिक्रेट वेबसाइटवरुन खरेदी केल्या.’
नकली हेल्मेट, प्रेशर कुकर विकणाऱ्यांविरोधात सरकारचं मोठं पाऊल
कशी करता येईल खरेदी? सिक्रेट वेबसाइटचा उपयोग करणाऱ्या युजर्सलाही Amazon प्रमाणे कस्टमर सर्विस मिळते आणि वस्तू Amazon च्या रिटर्न पॉलिसीअंतर्गत असते. जर तुम्ही खरेदी केलेली वस्तू आवडली नाही, तर ती 30 दिवसांच्या आत पुन्हा रिटर्नही करता येते. रिपोर्ट्सनुसार, Amazon Warehouse स्टॉकमध्ये 40,000 हून अधिक वस्तूंची खरेदी करता येते. इथे ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय मिळतात.