मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ मेसेज पाठवा अन् विनामूल्य घ्या तज्ज्ञांचा सल्ला

डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ मेसेज पाठवा अन् विनामूल्य घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सर्वात आधी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉप्यूटरवर WhatsApp ओपन करा.

सर्वात आधी मोबाइल, लॅपटॉप किंवा कॉप्यूटरवर WhatsApp ओपन करा.

व्हॉट्सअ‍ॅपवर एक समर्पित चॅटबॉट (chatbot) आधारित हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. याचा सर्वांत जास्त फायदा ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे.

मुंबई, 3 डिसेंबर : संपूर्ण जग गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा (corona) सामना करत असून लसीकरणानंतर आता कुठे परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येऊ लागली होती. आता पुन्हा कोरोना विषाणूचा (Coronavirus New Variant) नवीन प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरं जाताना आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यातच एक चांगली बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) कॉमन सर्व्हिस सेंटरने (CSC) आरोग्य सेवा मदत केंद्राची स्थापना केली आहे. याला व्हॉट्सअ‍ॅप डेस्क म्हणाता येईल. नागरिक व्हॉट्सअ‍ॅपद्वारे (WhatsApp) थेट डॉक्टरांशी संवाद साधू शकणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपवर एक समर्पित चॅटबॉट (chatbot) आधारित हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. याचा सर्वांत जास्त फायदा ग्रामीण किंवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे. नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करणं, त्यांना आरोग्यासंबंधी योग्य सल्ला देणं, कोरोनाची माहिती देणं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्क उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा : भविष्यातील डिजिटल विश्वाचं नेतृत्व भारताकडेच, मुकेश अंबानींना विश्वास

व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्कचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा सर्वांसाठी मोफत असणार आहे. युझर्स व्हॉट्सअ‍ॅपवर सीएससी हेल्थ सर्व्हिसेस हेल्पडेस्कचा मोफत वापर करू शकतात. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध असणार आहे. हेल्पडेस्कचा फायदा घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना +917290055552 या क्रमांकावर ‘Hi’ हा मेसेज पाठवावा लागेल आणि डॉक्टरांशी संपर्क साधण्यासाठी पर्याय निवडावा लागेल.

सामाजिक, आर्थिक आणि डिजीटली सर्वसमावेशक अशा चॅनेलच्या माध्यमातून आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या हेतूने हेल्पडेस्क तयार करण्यात आला आहे. व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्कवर सामान्य आरोग्य सेवा आणि कोरोनाशी संबंधित सर्व समस्यांवर योग्य मार्गदर्शन केलं जाईल.

हेही वाचा : '...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करु', अनिल परबांचा मोठा इशारा

ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांचा उत्तम वापर करता यावा, यासाठी वचनबद्ध असल्याचं सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे सीईओ दिनेश कुमार त्यागी यांनी म्हटलं आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या टेलि-हेल्थ कन्सल्टन्सीने प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचा व्हॉट्सअ‍ॅपवर विस्तार करणं हे आमचं पुढचं पाऊल आहे. देशाच्या दुर्गम भागातल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणं व्हॉट्सअ‍ॅप हेल्पडेस्कच्या माध्यमातून सुनिश्चित केलं जाईल. सीएससी हेल्थ सर्व्हिस हेल्पलाइन Infobip Technologies द्वारा विकसित करण्यात आली आहे.

First published: