Home /News /technology /

2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत

2017 नंतर पहिल्यांदाच महागणार Amazon Prime Membership, इतकी वाढणार किंमत

Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील.

  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : Amazon India लवकरच देशात प्राइम मेंबरशिपच्या (Prime Membership) किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील. Prime Membership च्या नव्या किंमती - ई-कॉमर्स ब्रँड Amazon, मासिक प्राइम मेंबरशिपची किंमत 129 रुपयांवरुन वाढवून 179 रुपये करणार आहे. 3 महिन्यांसाठी 329 रुपयांवरुन ही किंमत 459 रुपये होईल. तर वार्षिक प्राइम मेंबरशिप 1499 रुपयांत उपलब्ध होईल.

  Alert! Amazon-Flipkart वरुन Online Shopping करताना या 4 गोष्टी लक्षात ठेवाच

  Prime Membership मध्ये ग्राहकांना मिळतात या सुविधा - Amazon Prime Membership ग्राहकांना एलिजिबल ऑर्डरवर फास्ट आणि फ्री डिलीवरी, एक्सक्लूसिव डिल्स ऑफर्ससाठी Early Access, प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून OTT कंटेंट, प्राइम म्युझिकच्या माध्यमातून Add Free Music आणि युजर्सला एलिजिबल ई-बुक्स, कॉमिक्स आणि इतर अनेक गोष्टी वाचण्याची परवागनी देतं. कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय Prime Membership मध्ये ग्राहकांना या सुविधा मिळतात.

  Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान; वाचा सविस्तर

  2017 नंतर पहिल्यांदाच वाढली मेंबरशिप कॉस्ट - Amazon Prime Membership जुलै 2016 मध्ये 499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत भारतात लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 2027 पासून 999 रुपये करण्यात आलं. तेव्हापासून म्हणजेच 2017 नंतर मेंबरशिप कॉस्ट पहिल्यांदाच वाढली आहे.

  ...तर बंद होईल तुमचं Netflix, Hotstar आणि Amazon Prime, पेमेंटसाठी RBI च्या नव्या गाइडलाइन्स

  दरम्यान, अनेक युजर्स Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar सारख्या OTT प्लॅटफॉर्म्सचा किंवा DTH रिचार्ज करण्यासाठी ऑटो पेमेंट सर्विस क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंटचा वापर करतात. पण आता 1 ऑक्टोबरपासून RBI आदेशानुसार ऑटो पेमेंट सर्विस बंद केली जाणार आहे. RBI ने पेमेंटसाठी एक अतिरिक्त Additional Factor Authentication प्रोसेस जोडली आहे. देशात वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजीटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने Additional Factor Authentication लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Amazon subscription, Tech news

  पुढील बातम्या