• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान; वाचा सविस्तर

Amazon ची सिक्रेट वेबसाइट माहितेय का? अर्ध्याहून कमी किंमतीत मिळेल सामान; वाचा सविस्तर

स्वस्तात ऑनलाइन शॉपिंगसाठी आम्ही तुम्हाला एका 'सिक्रेट वेबसाइट' (amazon secret website) बद्दल सांगणार आहोत. ज्याठिकाणी तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत सामान खरेदी करू शकता.

  • Share this:
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: तुम्ही ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping offer) प्राधान्यानं करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्वस्तात ऑनलाइन शॉपिंग करता यावी यासाठी आम्ही तुम्हाला एका सीक्रेट वेबसाइटविषयी (e-commerce Secret Website) माहिती देणार आहोत. या वेबसाइटवर तुम्हाला अगदी निम्म्या किमतीत वस्तू खरेदी करता येणार आहेत. ही वेबसाइट आहे, ई- कॉमर्स कंपनी (E-Commerce Company Amazon Warehouse Secret Website) अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसची. इथं तुम्हाला अगदी 7 हजार रुपयांची वस्तू केवळ 2 हजार रूपयांत खरेदी करता येईल. अ‍ॅमेझॉनच्या या सीक्रेट वेबसाइटवर तुम्ही परत केलेले म्हणजेच रिटर्न प्रॉडक्ट (buy Return Product at cheap cost), अत्यंत अल्प प्रमाणात नुकसान झालेले प्रॉडक्ट कमी किमतीत खरेदी करू शकता. अ‍ॅमझॉन वेअर हाऊसमधून करा खरेदी मार्टिन लुईसच्या एका वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसवर ग्राहक 7 ते 8 हजार रूपयांपर्यंत बचत करू शकता. उदाहरणार्थ, बहुतांश प्रमुख वेबसाइटवर प्रेशर वॉशरची किंमत सुमारे 20 हजारांपेक्षा अधिक आहे. मात्र अ‍ॅमेझॉन वेअरहाउसवर मात्र हा वॉशर 13 हजार रूपयांदरम्यान उपलब्ध आहे. नेसकॉफी सिंगल सर्व्हिंग कॉफी मशीनसह अन्य सर्व कॉफी मशीन्सची किंमत अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसवर केवळ 2 हजार रूपये आहे. मात्र हेच मशीन्स अन्य वेबसाइटवर 5 ते 7 हजार रूपयांच्या आसपास उपलब्ध आहेत. 1000 रुपये होणार LPG Gas Cylinder ची किंमत? सब्सिडीबाबत सरकारची अशी आहे योजना Moneysavingexpert.com च्या म्हणण्यानुसार, एका युजर्सनं आपला अनुभव शेअर करताना लिहिलं की, 'एकदा मी प्रेशर वॉशर खरेदी करण्यासाठी अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसवर गेलो. बहुतांश प्रमुख वेबसाइटसवर या वॉशरची किंमत 20 हजार रूपयांपेक्षा अधिक होती. मात्र हेच उत्पादन मला अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसवर केवळ 13 हजार रुपयांदरम्यान मिळालं. ही डील मला फार आवडली आणि त्यानंतर प्रत्येक वस्तुची खरेदी मी येथूनच करू लागलो.' जाणून घेऊया कस्टमर सर्व्हिस पॉलिसीविषयी या सिक्रेट वेबसाइटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना देखील अ‍ॅमेझॉनप्रमाणेच कस्टमर सर्व्हिस (Amazon Customer Service) दिली जाते. तसेच अ‍ॅमेझॉनच्या रिटर्न पॉलिसी (Return Policy) प्रमाणेच ग्राहक येथे खरेदी केलेली वस्तू पुन्हा परत करू शकतात. जर तुम्ही खरेदी करून समाधानी नसाल किंवा एखादं उत्पादन, वस्तू जर तुम्हाला आवडली नाही, तर ती तुम्ही 30 दिवसांच्या आत रिटर्न करू शकता आणि संपूर्ण परतावा मिळवू शकता. या सीक्रेट वेबसाईट विषयी अ‍ॅमेझॉनने सांगितलं की इथं प्रत्येक उत्पादनाची कार्यक्षमता आणि भौगोलिक स्थितीचं निरीक्षण केलं जातं. त्यानंतरच उत्पादनाचं ग्रेडींग करून विक्री केली जाते. Gold Rate Today: खूशखबर! एका महिन्यात 1200 रुपयांनी उतरले सोन्याचे दर 40,000 हून अधिक उत्पादने अहवालानुसार, अ‍ॅमेझॉन वेअर हाऊसच्या स्टॉकमध्ये 40,000 हून अधिक उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादनं ग्राहक कमी किमतीत खरेदी करू शकतात. ग्राहकांना इथं सुमारे 34 सेक्शन उपलब्ध आहेत. यात कॉम्प्युटर आणि पूरक अॅक्सेसरिज, घर आणि स्वयंपाकघर, खेळणी, व्हिडीओ गेम, इलेक्ट्रॉनिक्स आणि फोटोसह अनेक उत्पादनांचा समावेश आहे. याचा अर्थ अॅमेझॉन वेअर हाऊसवर तुमच्या आवडीच्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
First published: