नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : 3 ऑक्टोबरपासून देशातील प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्स Amazon, Flipkart ने आपले सेल सुरू केले आहेत. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल आणि अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये अनेक ऑफर्स आणि विविध प्रोडक्टवर सूट मिळते आहे. परंतु शॉपिंगवेळी अशा काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ज्यात तुम्हाला कोणत्याही फसवणुकीचा सामना करावा लागू नये.
Cashback पासून सावध राहा -
अनेक डील्समध्ये कॅशबॅक ऑफर केली जाते. पण अनेकदा ही कॅशबॅक ऑफर पैसे कमावण्याची स्किम असते. वस्तू विकणारे कॅशबॅकची ऑफर देवून ग्राहकांकडून त्यांच्या बजेट बाहेरील वस्तू खरेदी करून घेतात आणि त्याला कॅशबॅकचं नाव देतात.
MRP -
सेलमध्ये 70 ते 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पण या सूटमध्ये MRP कडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा वस्तूवर दिलेली सूट आणि खरी किंमत यातील मार्जिन अधिक नसतं. MRP अशाप्रकारे चुकीची लिहिली जाते, की तुम्हाला सूट दिलेला आकडा अधिक वाटावा. त्यामुळे कोणतंही प्रोडक्ट खरेदी करताना अनेक साइट्सवरही प्रोडक्टची MRP पाहणं गरजेचं आहे.
प्रोडक्ट Review -
Amazon ने नुकतंच काही चीनी कंपन्यांना आपल्या शॉपिंग वेबसाइटवर बॅन केलं होतं. लोकांकडून प्रोडक्ट्ससाठी खोटे रिव्ह्यू लिहिण्याच्या नावाखाली हे बॅन करण्यात आलं होतं. त्यामुळे रिव्ह्यू नीट वाचणं, त्याची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्याशिवाय वस्तूच्या गॅरंटी आणि वॉरंटीबाबतही योग्य ती माहिती घेणं गरजेचं आहे.
No Cost EMI -
अनेक वेबसाइट्सवर No Cost EMI हा ऑप्शन दिलेला असतो. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, नो कॉस्ट ईएमआय केवळ मार्केटिंगचा एक भाग आहे, ज्यात कंपनी आणि बँक आधीपासूनचं सामिल असतात. No Cost EMI मध्ये प्रोडक्टची किंमत वाढवली जाते आणि त्यातून बँकेचं व्याज भरलं जात, असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे वस्तूची किंमत इतर ठिकाणीही तपासणं गरजेचं आहे.
अशा गोष्टींकडे ऑनलाइन शॉपिंग करताना लक्ष देणं गरजेचं आहे. सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स मिळतील, पण या ऑफर्सच्या जाळ्यात अडकून तुमचं नुकसान होऊ देऊ नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.