• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • तुमच्या फोनवरही असा मेसेज आलाय का? लगेच करा डिलीट, अन्यथा खाली होईल बँक अकाउंट

तुमच्या फोनवरही असा मेसेज आलाय का? लगेच करा डिलीट, अन्यथा खाली होईल बँक अकाउंट

हॅकर्स फसवणूक करण्यासाठी युजर्सकडून ओटीपी मिळवतात आणि त्यानंतर ऑनलाईन फ्रॉड केला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने ओपीटी मागितल्यास सावध होण्याचं त्यांनी सांगितलं होतं. SMS, OTP द्वारे नेमकं कसा होतोय फ्रॉड?

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जुलै: कोरोना काळात ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online Payment) मोठी वाढ झाल्यानंतर, त्यासोबतच ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) प्रकरणांतही मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात अधिकतर लोकांनी ऑनलाईन पेमेंट करण्याचा मार्ग स्वीकारल्याने ऑनलाईन फसवणुकीचं (Online Fraud) प्रमाणही वाढलं. फ्रॉड करणारे विविध मार्गांनी, विविध पद्धतींनी लोकांची फसवणूक करत आहेत. यादरम्यान बँका तसंच टेलिकॉम कंपन्यांकडून ऑनलाईन पेमेंट करताना सावध राहण्याचं सांगण्यात येत आहे. एअयरटेलचे (Airtel) सीईओ गोपाल विट्टल यांनी, नुकतंच ग्राहकांना सायबर फ्रॉडपासून (Cyber Fraud) सावध राहण्याचा इशारा दिला होता. हॅकर्स फसवणूक करण्यासाठी युजर्सकडून ओटीपी मिळवतात आणि त्यानंतर ऑनलाईन फ्रॉड केला जातो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने ओपीटी मागितल्यास सावध होण्याचं त्यांनी सांगितलं होतं. SMS, OTP द्वारे नेमकं कसा होतोय फ्रॉड? युजर्सला आता KYC वेरिफिकेशनच्या नावाखाली एक SMS पाठवला जात आहे. या मेसेजला उत्तर न दिल्यास तुमचा नंबर 24 तासात ब्लॉक केला जाईल असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. एअरटेल (Airtel), वोडाफोन-आयडिया तसंच जिओ युजर्सलाही कंपनीच्या नावाने केव्हायसी वेरिफिकेशनसाठी फेक, स्कॅम मेसेज (Fake SMS) येत आहेत. अनेक युजर्सनी ट्विटरवर अशा फ्रॉड मेसेजबाबत सांगितलं आहे.

  Airtel ग्राहकांना मोठा फटका; प्रीपेड प्लॅन दरात वाढ,आता किती रुपये द्यावे लागणार

  ज्या युजर्सचं एअयरटेल सिम कार्ड आहे, त्यांना त्यांच्या मोबाईलवर 9114204378 या नंबरद्वारे एक मेसेज येतो. 'तुमचं सिम कार्ड स्विच ऑफ होईल. त्यामुळे सिम अपडेट करण्यासाठी 8582845285 या क्रमांकावर कॉल करा. काही वेळात तुमचं सिम ब्लॉक होऊ शकतं'. असं फेक मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. परंतु या मेसेजला रिप्लाय केल्यास, तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतो.

  एक ऑफर पडली महागात,भोपाळच्या व्यावसायिकाला मुंबईतून लाखोंचा गंडा;अशी चूक करू नका

  युजर्सनी कोणत्याही नंबरवर कधीही रिप्लाय करू नये. कोणालाही तुमचे पर्सनल डिटेल्स देऊ नका. टेलिकॉम कंपन्यांकडून एकदा नंबर दिल्यानंतर कधीही KYC वेरिफिकेशन होत नाही. वेरिफिकेशनसाठी कोणत्याही नंबरवरुन अशाप्रकारे मेसेज पाठवले जात नाहीत. त्यामुळे युजर्सनी कधीही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, क्लिक केल्यास चुकूनही पुढील माहिती देऊ नका. अनोळखी कॉल आल्यास त्यवरही तुमचे कोणतेच डिटेल्स सांगू नका.
  Published by:Karishma
  First published: