नवी दिल्ली, 29 जुलै: टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. एअरटेलने सुरुवातीच्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत (Entry Level Recharge Plan Price) तब्बल 60 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीमुळे एअरटेलचा सुरुवातीचा 49 रुपयांचा रिचार्ज प्लॅन बंद करण्यात आला आहे. आता एअरटेलचा सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 79 रुपयांच्या स्मार्ट रिचार्जपासून सुरू होणार आहे. यात ग्राहकांना दुप्पट डेटा आणि चारपट अधिक आउटगोईंग मिनिटं मिळणार आहेत. हा रिचार्ज प्लॅन 29 जुलैपासून लागू होणार आहे.
एअरटेलच्या या 79 रुपयांच्या प्लॅनमध्ये 64 रुपये टॉकटाइम, 200 MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. एअरटेलने केलेला हा बदल चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी असून आता ग्राहक आपल्या एन्ट्री लेवल रिचार्जमध्ये बॅनेन्स संपण्याची चिंता न करता अधिक काळापर्यंत वापरु शकतील, असं कंपनीने म्हटलं आहे.
दुसऱ्यांदा भारती एअरटेलने बेस लेवल प्लॅनमध्ये वाढ केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये एअरटेलने 35 रुपयांचा एन्ट्री-लेवल प्लॅन बंद करुन 49 रुपयांचा प्लॅन सुरू केला होता. या एन्ट्री-लेवल प्लॅनचा अधिकतर वापर 2G, फीचर फोन वापरणारे युजर्स करतात. डिसेंबर 2019 मध्ये एअरटेलने टॅरिफ प्लॅनमध्ये 35 रुपयांवरुन 49 रुपये वाढ केल्यानंतर जवळपास 35 मिलियन युजर्स गमावले होते. परंतु याच्या ARPU अर्थात Average Revenue Per User मध्ये सुधारणा झाली होती.
एक ऑफर पडली महागात,भोपाळच्या व्यावसायिकाला मुंबईतून लाखोंचा गंडा;अशी चूक करू नका
Airtel Shares -
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एअरटेलचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 569 रुपयांवर पोहोचला आहे. भारती एअरटेलने कोरोना काळात कमी उत्पन्न असलेल्या 5.5 कोटी ग्राहकांना 49 रुपयांचा रिचार्ज मोफत उपलब्ध केला होता, जेणेकरुन ते कठीण काळात आपल्या कुटुंबियांशी जोडले राहू शकतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये 38 रुपयांच्या टॉकटाइमसह 28 दिवसांची वॅलिडिटी आणि 100 MB डेटा देण्यात येत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.