मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

एक ऑफर पडली महागात, भोपाळच्या व्यावसायिकाला मुंबईतून लाखोंचा गंडा; तुम्हीही अशी चूक करू नका

एक ऑफर पडली महागात, भोपाळच्या व्यावसायिकाला मुंबईतून लाखोंचा गंडा; तुम्हीही अशी चूक करू नका

मुंबईतील कार एजेंटच्या नावाने एका व्यक्तीने भोपाळमधील व्यावसायिकाला तब्बल 67 लाखांचा गंडा घातला आहे. केवळ एका ऑफरच्या जाळ्यात अडकून व्यावसायिकाला मोठा फटका बसला आहे.

  • Published by:  Karishma
भोपाळ, 29 जुलै: कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. असाच एक फसवणुकीचा प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उघड झाला आहे. मुंबईतील कार एजेंटच्या नावाने एका व्यक्तीने भोपाळमधील व्यावसायिकाला तब्बल 67 लाखांचा गंडा घातला आहे. केवळ एका ऑफरच्या जाळ्यात अडकून व्यावसायिकाला मोठा फटका बसला आहे. मुंबईतील कार एजेंट सांगत व्यावसायिकाची मर्सिडीज कारच्या नावाने 67 लाखांची फसवणूक झाली आहे. व्यावसायिक 3 लाखांच्या एका डिस्काउंट ऑफरमध्ये अडकला आणि मोठी फसवणूक झाली. साहिब गंगवानी असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते एका कंपनीचे डायरेक्टर आहेत. 2020 मध्ये त्यांनी मर्सिडीज घेण्याचं ठरवलं. त्यांनी यासाठी ऑनलाईन सर्च करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना मुंबईतील मैत्री ही वेबसाईट दिसली. या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना मर्सिडीजवर 3 लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर दिसली. 70 लाखांची मर्सिडीज 67 लाखांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

Fraud Alert! या 4 चुका अजिबात करू नका, Online Banking बाबत महत्त्वपूर्ण माहिती

साहिब यांनी वेबसाईटवर दिलेल्या नंबरवर संपर्क करुन चर्चा केली. समोरच्या व्यक्तीने तो नवी मुंबईत असणाऱ्या एका कंपनीचा एजेंट असल्याचं सांगितलं. दोघांमध्ये चर्चा झाली आणि डीलदेखील झाली. साहिब यांनी 67 लाख रुपये इतकी मोठी रक्कम समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली. परंतु एक महिना झाल्यानंतरही कार डिलीव्हर झाली नाही. त्यावेळी साहिब यांनी त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर बंद करण्यात आला होता.

Alert! Fraud करण्यासाठी सायबर क्रिमिनल्सकडून केला जातो या ट्रिकचा वापर

70 लाख रुपयांची गाडी 67 लाखांत, या केवळ 3 लाखांच्या ऑफरच्या जाळ्यात अडकून त्यांना 67 लाखांचा मोठा फटका बसला. साहिब यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. पोलीस मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती मिळवत आहेत.
First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

पुढील बातम्या