मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp नंतर आता Gmail, Google Pay, आणि Chrome क्रॅश, एका सेटिंगने असं होईल सुरू

WhatsApp नंतर आता Gmail, Google Pay, आणि Chrome क्रॅश, एका सेटिंगने असं होईल सुरू

या टूलद्वारे फेक न्यूज कमी होण्यास मदत होईल.  यामुळे चुकीची माहिती पसरण्यापासून आळा घालण्यास मदत होईल.

या टूलद्वारे फेक न्यूज कमी होण्यास मदत होईल. यामुळे चुकीची माहिती पसरण्यापासून आळा घालण्यास मदत होईल.

अ‍ॅप क्रॅश होत असल्याची समस्या अनेक अँड्रॉईड युजर्सला येत आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये हे सर्व अ‍ॅप सुरू होत नसतील, तर घाबरण्याची गरज नाही. सेटिंगमध्ये केवळ एक बदल करुन ही समस्या सोडवली जाऊ शकते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 मार्च : काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि आता मंगळवारी Google चे अनेक अ‍ॅप क्रॅश झाले. यात जीमेल (Gmail), गुगल पे (Google Pay), गुगल क्रोम (Google Chrome) सामिल आहे. त्यामुळे अनेक युजर्सला मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. मोबाईलवर ना जीमेल ओपन होत होतं, ना गुगल पे आणि क्रोमचाही वापर करता येत नव्हता. Google नेही अ‍ॅप क्रॅश होत असल्याची बाब मान्य करुन, मंगळवारी सकाळी या क्रॅश अ‍ॅपवर काम सुरू असल्याची माहिती दिली.

Android System WebView हे, अ‍ॅप क्रॅश होण्यामागचं एक कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच सिस्टममुळे अँड्रॉईड अ‍ॅप्सवर वेब कन्टेंन्ट पाहता येऊ शकतो. यातच काही समस्या आल्याने, अ‍ॅप्स क्रॅश होत आहेत. गुगलने याबाबत एक स्टेटमेंटही जारी केलं आहे. या स्टेटमेंटमध्ये कंपनीने सांगितलं की, काही युजर्ससाठी अ‍ॅप क्रॅश होत आहेत आणि हे WebView मुळे होत आहे. कंपनी ही समस्या सोडवण्यावर काम करत असल्याचं गुगलने सांगितलं आहे.

अ‍ॅप क्रॅश होत असल्याची समस्या अनेक अँड्रॉईड युजर्सला येत आहे. जर तुमच्याही मोबाईलमध्ये हे सर्व अ‍ॅप सुरू होत नसतील, तर घाबरण्याची गरज नाही. सेटिंगमध्ये केवळ एक बदल करुन ही समस्या सोडवली जाऊ शकते.

(वाचा - घरबसल्या असं मिळवा तुमचं डिजिटल Voter ID; जाणून घ्या प्रक्रिया)

Gmail साठी डेक्सटॉप वर्जनचा वापर करा -

Gmail ने आपल्या अधिकृत पेजवर माहिती देत सांगितलं की, 'जीमेलचा वापर करताना युजर्सला समस्या येत आहेत. अनेक युजर्स जीमेलचा वापर करू शकत नाहीत. आम्ही ही समस्या दूर करण्यावर काम करत असून लवकरच याबाबत युजर्सला अपडेट केलं जाईल.' गुगलने याबाबत बोलताना सांगितलं की, काही काळासाठी Gmail च्या अँड्रॉईड अ‍ॅपऐवजी, युजर्स डेक्सटॉपवर Gmail चा वापर करू शकतात.

Google चे अनेक अ‍ॅप्स अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये (Android devices) सुरू न होत असल्याने, हजारो युजर्स Downdetector मध्ये अपडेट पाहू लागले. ही साईट वेबसाईट आणि अ‍ॅप क्रॅशची माहिती देते. त्यानंतर Downdetector ने ट्विटरवर ही समस्या पोस्टही केली होती.

(वाचा - हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय)

म्हणून क्रॅश झालं Google -

रिपोर्ट्सनुसार, ही समस्या Android WebView मुळे झाल्याचं सांगण्यात आलं. WebView मुळे काही अ‍ॅप क्रॅश झाले. ही Chrome संचालित सुविधा आहे, जी युजर्सला Android अ‍ॅप्समध्ये वेबपेज पाहण्याची परवानगी देते.

(वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

या सेटिंग्जने करा बदल -

Samsung Us सपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, युजर्स WebView update ला हटवून, फोन रिस्टार्ट केल्यास ही समस्या सोडवली जाऊ शकते. यासाठी युजर्स सेटिंगमध्ये काही बदल करू शकतात.

सर्वात आधी सेटिंग्जमध्ये जावं लागेल. त्यानंतर अ‍ॅप्समध्ये तीन डॉट्स आयकॉनवर टॅप करावं लागेल. येथे Show System Apps मध्ये जाऊन Android System WebView सर्च करावं लागेल. हे सर्च करुन Uninstall Updates वर क्लिक करावं लागेल.

First published:

Tags: Android, Google