मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /घरबसल्या असं मिळवा तुमचं डिजिटल Voter ID; जाणून घ्या प्रक्रिया

घरबसल्या असं मिळवा तुमचं डिजिटल Voter ID; जाणून घ्या प्रक्रिया

भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी रोजी डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली आहे. जाणून घ्या तुमच्या मोबाईल फोनवर कसं डाउनलोड कराल तुमचं मतदान ओळखपत्र...

भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी रोजी डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली आहे. जाणून घ्या तुमच्या मोबाईल फोनवर कसं डाउनलोड कराल तुमचं मतदान ओळखपत्र...

भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी रोजी डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली आहे. जाणून घ्या तुमच्या मोबाईल फोनवर कसं डाउनलोड कराल तुमचं मतदान ओळखपत्र...

नवी दिल्ली, 23 मार्च : वोटर आयडी कार्ड अर्थात मतदान ओळखपत्र सरकारी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक डॉक्यूमेंट आहे. आता मतदान ओळखपत्र आपल्या मोबाईल फोनवरही डाउनलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे वोटर आयडी, आधार कार्डप्रमाणेच मोबाईलमध्ये सहजपणे बाळगता येऊ शकतं. भारतीय निवडणूक आयोगाने 25 जानेवारी रोजी डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली आहे. जाणून घ्या तुमच्या मोबाईल फोनवर कसं डाउनलोड कराल तुमचं मतदान ओळखपत्र...

e-EPIC एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट (PDF) फॉर्मेट आहे. हे मोबाईल किंवा कंम्यूटरवर सेल्फ-प्रिंटेबल रुपात डाउनलोड केलं जाऊ शकतं. वोटर या डिजिटल कार्डला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करुन स्टोर करू शकतात. हे प्रिंटही करता येऊ शकतं. नॅशनल वोटर सर्विस पोर्टलवरुन डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड केलं जाऊ शकतं.

e-EPIC (Elector’s Photo Identity Card) म्हणजे काय?

हे अत्यंत सुरक्षित असं पीडीएफ स्वरूपातील मतदार ओळखपत्र आहे. ते मोबाइलवर किंवा कंम्यूटरवर डाऊनलोड करता येणार आहे. हे मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवता येईल किंवा डिजिटल लॉकरमध्ये पीडीएफ स्वरुपात अपलोड करून ठेवता येईल. त्याची प्रिंट करून लॅमिनेट करता येईल.

(वाचा - जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक)

डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी http://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जावं लागेल. येथे एक अकाउंट बनवावं लागेल. त्यानंतर लॉग-इन करुन वेबसाईटवर दिसणाऱ्या e-EPIC या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर e-EPIC नंबर किंवा रेफरेंस नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP सबमिट केल्यानंतर e-EPIC डाउनलोड करुन तुमचं डिजिटल कार्ड डाउनलोड करू शकता.

(वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

जर कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असेल, तर हे डाउनलोड करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे मोबाईल नंबर अपडेट करुन तुमचं कार्ड डाउनलोड करू शकता.

First published:

Tags: Digital services, Identity verification, Online, Tech news, Technology