मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

YouTube वरील जाहिरातींना कंटाळला आहात? मग ही Trick वापरा Ads Free व्हिडीओ पाहा

YouTube वरील जाहिरातींना कंटाळला आहात? मग ही Trick वापरा Ads Free व्हिडीओ पाहा

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

Youtube वरील लोकांना न आवडणारी गोष्ट म्हणजे जाहिराती. तुम्हाला देखील याचा कंटाळा आला असेल, तर तुम्ही त्याला रोखू शकता. यासाठी तुम्हाला एक Trick वापरावी लागेल, ती कोणती? चला जाणून घेऊ

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 6 सप्टेंबर : जगातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्मपैकी YouTube हे एक आहे. खरंतर हे एक व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. येथे नुसतेच मनोरंजन नाही तर आपल्या व्हिडीओच्या स्वरुपात माहिती देखील मिळते. जी खूपच फायद्याची ठरते.

त्यात हाऊस वाईफ किंवा घरी असलेल्या महिलांसाठी हा एक विरंगुळा आहे. येथे त्या मालिका, जेवणाचे कार्यक्रम, देव किंवा माहिती इत्यादींसारखे व्हिडीओ पाहात असतात. तर अनेक तरुण पिढी टेक्नोलॉजी, इन्वेस्टमेंट सारखी माहिती मिळवत असतात. म्हणजेच काय तर इथे सगळ्यांच्या आवडीप्रमाणे व्हिडीओ पाहायला मिळतात.

एवढंच नाही तर इथे सिनेमा देखील पाहाता येतात. परंतू या सगळ्यात लोकांना न आवडणारी गोष्ट म्हणजे जाहिराती. या जाहिराती लोकांना पाहायला आवडत नाही. आधीच्या काळात फार कमी जाहिराती येथे याच्या, नंतर त्यासाठी स्किपचा पर्याय देखील उपलब्ध केला गेला. परंतू कालांतराने यामध्ये ही बदल झाले. ज्यानंतर आता जाहिराती सक्तीच्या झाल्या आहेत. ज्याला लोक कंटाळले आहेत.

तुम्ही देखील या जाहिरातींना कंटाळला असाल, तरी आता काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी एक युक्ती आणली आहे ज्याद्वारे तुम्ही YouTube व्हिडीओंच्या मध्यभागी जाहिराती ब्लॉक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही युक्ती.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर Google Chrome उघडावे लागेल. यानंतर अॅडब्लॉकर एक्स्टेंशन क्रोम शोधा. आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला AdBlock — best ad blocker – Google Chrome दिसेल. यावर क्लिक करा.

हे वाचा : Instagram चा कंट्रोल आता तुमच्या हातात; होणार हे महत्त्वाचे बदल

यानंतर पुन्हा एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये Add to Chrome लिहिलेले दिसेल. यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर एक फाईल डाउनलोड होईल. मग त्याला इंस्टॉल केलं जाईल, जर असं झालं नाही तर त्याला तुम्ही पुन्हा इंस्टॉल करा.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, Chrome बंद करा. त्यानंतर ते पुन्हा उघडा. त्यानंतर जेव्हा तुम्ही गुगल क्रोमचा URL बार पाहाल तेव्हा तुम्हाला एक Extension दिसेल. यावर क्लिक करा.

येथे तुम्हाला AdBlock-best ad blocker दिसेल, यावर क्लिक करा. असे केल्याने YouTube वर येणाऱ्या जाहिराती ब्लॉक होतील. तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय व्हिडीओ पाहण्यास सक्षम असाल.

हे वाचा : Facebook Features: फेसबुक युझर्सना झटका; 'हे' लोकप्रिय फीचर होणार बंद

तसेचा यासाठीचा दुसरा पर्याय म्हणजे युजर्स युट्युबचे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला जाहिराती दिसणार नाहीत. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी YouTube Premium चे सदस्यत्व घ्यायचे असेल तर तुम्हाला 139 रुपये खर्च करावे लागतील.

First published:

Tags: Social media, Social media trends, Tech news, YouTube Channel