मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram चा कंट्रोल आता तुमच्या हातात; होणार हे महत्त्वाचे बदल

Instagram चा कंट्रोल आता तुमच्या हातात; होणार हे महत्त्वाचे बदल

इन्टाग्रामध्ये होणार नवे बदल.

इन्टाग्रामध्ये होणार नवे बदल.

काय पाहायचं आणि काय नाही, याचं कंट्रोल इन्स्टाग्राम युझर्सकडे असावं असावं या दृष्टीने मेटा कंपनी प्रयत्न करत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 सप्टेंबर : इन्स्टाग्राम वापरताना बऱ्याच वेळा तुम्हाला नको असलेला कंटेंट समोर येण्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल. अशा वेळी तुमच्याकडे स्क्रोल करण्याचा पर्याय असतो; मात्र तसं वारंवार घडल्यास इन्स्टा वापरणं ही एक डोकेदुखी होऊन बसते. यामुळेच इन्स्टाग्राम युझर्सना (Instagram Users) काय पाहायचं आहे हे ठरवण्यावर त्यांचं नियंत्रण (Instagram Users Control) असावं या दृष्टीने मेटा कंपनी प्रयत्न करत आहे. इन्स्टाग्रामवर एका वेळी अधिक पोस्ट्सना ‘नॉट इंटरेस्टेड’ (Instagram new features) मार्क करता येईल का किंवा मग कॅप्शनमध्ये ठरावीक शब्द, शब्दसमूह किंवा इमोजी असलेल्या पोस्ट दिसू नयेत यासाठी काय करता येईल याबाबत मेटा (Meta working on New Insta tools) काम करत आहे. या माध्यमातून तुम्ही ठराविक हॅशटॅगशी संबंधित पोस्टदेखील आपल्या फीडमधून गायब करू शकाल.

“एक्सप्लोअर विभागातल्या एकाहून अधिक पोस्ट्सना नॉट इंटरेस्टेड (Not interested option on Insta) हा पर्याय लागू करण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. हे सेटिंग इनेबल केल्यास तुम्हाला ठरावीक प्रकारच्या पोस्ट भविष्यात दिसणार नाहीत. तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा तुमच्याशी ती संबंधित नसेल, तर त्यासंबंधी पोस्ट पाहणं बंद करण्यासाठी तुम्ही हे फीचर वापरू शकाल,” अशी माहिती कंपनीने दिली. मेटा ही इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी आहे.

तुमच्या ‘फेव्हरिट’ पोस्ट दिसणार वेगळ्या

इन्स्टाग्रामवर तुम्हाला तुमच्या फेव्हरिट अकाउंट्सची (Instagram Favourite accounts) यादी करता येते. जेव्हा तुम्ही एखादं अकाउंट फेव्हरिट यादीत जोडाल, तेव्हा तुम्हाला त्या अकाउंटवरून झालेल्या पोस्ट्स अधिक दिसतील. सोबतच, केवळ तुमच्या फेव्हरिट यादीतल्या अकाउंट्सच्या पोस्ट पाहण्यासाठी एक विशेष फीड देण्यात येणार असल्याचं 'मेटा'ने स्पष्ट केलं.

हे वाचा - Social Media Safety: तरुणांनो, सोशल मीडिया वापरताना रहा सावध; ‘या’ 8 गोष्टींची घ्या काळजी

फॉलोइंग आणि नॉट इंटरेस्टेड

‘फॉलोइंग’ या आणखी एका टूलवर (New Instagram tools) मेटा काम करत आहे. या फीचरमुळे तुम्हाला केवळ तुम्ही ज्या अकाउंट्सना फॉलो करत आहात त्यांच्याच पोस्ट दिसतील आणि त्यादेखील क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये. म्हणजेच सगळ्यात नवीन पोस्ट सर्वांत आधी दिसेल. यातल्या एखाद्या पोस्टवर तुम्ही ‘नॉट इंटरेस्टेड’ हा पर्याय निवडला, तर त्याच्याशी संबंधित अगदी कमी पोस्ट्स तुम्हाला भविष्यात आपल्या फीडमध्ये पाहायला मिळतील.

टेक अ ब्रेक

सध्या इन्स्टाग्राम बऱ्याच प्रमाणात सजेस्टेड पोस्ट (Instagram suggested posts snoozing) दाखवतं. यामध्ये तुम्ही ज्या अकाउंट्सना फॉलो करत नाही, त्यांच्या पोस्ट्सही तुम्हाला आवडतील म्हणून समोर दाखवल्या जातात. अशा प्रकारच्या पोस्ट्स तुम्हाला नको असतील, तर इन्स्टाचं 'टेक अ ब्रेक' फीचर वापरता येईल. यासाठी तुम्हाला स्क्रीनवर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या एक्स बटणावर टॅप करायचं आहे. यानंतर ‘स्नूझ ऑल सजेस्टेड पोस्ट्स’ या पर्यायावर टॅप करायचं आहे. यानंतर अशा प्रकारच्या सजेस्टेड पोस्ट्स 30 दिवसांसाठी बंद होतील, असं मेटा कंपनीने स्पष्ट केलं.

हे वाचा - Whatsapp मध्ये 'Language'शी संबंधित हे खास फीचर लवकरच होणार उपलब्ध; स्क्रीनशॉटमधून झाला खुलासा

यामुळे आता इन्स्टाग्रामचा रिमोट हा बऱ्यापैकी वापरकर्त्याच्या हातात येणार आहे.

First published:

Tags: Instagram, Tech news, Technology