मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook Features: फेसबुक युझर्सना झटका; 'हे' लोकप्रिय फीचर होणार बंद

Facebook Features: फेसबुक युझर्सना झटका; 'हे' लोकप्रिय फीचर होणार बंद

Facebook neighborhood feature: फेसबुकमधलं एक महत्त्वाचं फीचर कंपनी लवकरच बंद करणार आहे. नेबरहूड्स (Neighborhoods) नावाचं फीचर पुढच्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यापासून युझर्सना वापरता येणार नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 सप्टेंबर: फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम हे सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहेत. यात फेसबुक विशेष लोकप्रिय आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही कंटेंट, फोटो, व्हिडिओ शेअर करू शकता. तसंच फेसबुक लाइव्हची सुविधादेखील युझर्सना मिळते. युझर्सचा कल, आवड आणि गरज ओळखून फेसबुक सातत्याने नवीन फीचर्स (Facebook feature) लॉंच करत असतं. अलीकडच्या काळात काही खास फीचर्स फेसबुकने युझर्ससाठी आणली आहेत. ह; मात्र भारतीय युझर्सवर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही.

भारतात अनेक युझर्स फेसबुक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. पुढील महिन्यापासून नेबरहूड्स हे खास फीचर बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून हे फीचर बंद होणार आहे. नेबरहूड्स हे हायपर लोकल फीचर आहे. या फीचरच्या मदतीनं युझर्सना आपल्या आसपासच्या लोकांशी कनेक्ट होणं शक्य होतं.

'स्थानिक समुदायाला (Local Community) एकत्र आणणं हा नेबरहूड्स हे फीचर सुरू करण्याचा उद्देश होता; मात्र नेबरहूड्सच्या तुलनेत ग्रुप्स हा सर्वोत्तम मार्ग असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. यासाठी कंपनीनं काही मार्गदर्शक तत्त्वंही तयार केली होती; मात्र आता 1 ऑक्टोबरपासून ही सुविधा बंद होत आहे,' असं कंपनीनं एका निवेदनात म्हटलं आहे.

हेही वाचा-Whatsappवर चॅटिंग करत असूनही दिसाल ऑफलाइन, लवकरच येणार खास फीचर

नेबरहूड्स या फीचरच्या मदतीनं युझर्स त्यांच्या स्थानिक भागातली नवी ठिकाणं शोधू शकत होते. हा स्थानिक समुदायाचा एक भाग बनला होता. हे फीचर सर्वप्रथम कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये 2022 मध्ये रोलआउट करण्यात आलं होतं. या सुविधेचा लाभ घेऊन स्वतंत्र प्रोफाइल तयार करण्याचा पर्याय युझर्सना उपलब्ध होता. या फीचरचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला नव्हता. मेटा कंपनीला या फीचरचं महत्त्व कळलं नसल्याचं आता बोललं जात होतं. हे फीचर बंद करण्याच्या निर्णयामुळे हे गोष्ट अधोरेखित झाली आहे; पण कंपनीनं याबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

मेटा कंपनी सध्या कॉस्ट कटिंगवर काम करत आहे. या निर्णयाचा कंपनीला निश्चितच फायदा होणार आहे. तसंच नेबरहूड्स फीचर बंद केल्यानं कंपनीच्या शेअरहोल्डर्सचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कंपनीनं नेबरहूड्स फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Facebook