जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / T20 World Cup: नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट? पाहा समीकरण

T20 World Cup: नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट? पाहा समीकरण

नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट?

नेदरलँडची विजयी सलामी, श्रीलंका वर्ल्ड कपमधून होणार आऊट?

T20 World Cup: चार संघांपैकी सुपर 12च्या तिकिटासाठी नामिबियापाठोपाठ नेदरलँडनंही आपला हक्क सांगितला आहे. याचा अर्थ श्रीलंकन संघाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

गिलॉन्ग, 16 ऑक्टोबर: आधी नामिबिया आणि त्यानंतर नेदरलँडनं यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मोहिमेत विजयी सलामी दिली. नेदरलँडनं क्वालिफाईंग फेरीच्या दुसऱ्या सामन्यात यूएईचा 3 विकेट्सनी पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात दोन्ही संघांनी विजयाचा आटोकाट प्रयत्न केला. पण अखेर नेदरलँडनं विजयी लक्ष्य गाठून स्पर्धेतला पहिला विजय साजरा केला. एकूणच स्पर्धेतला पहिला दिवस रोमांचक ठरला. सलामीच्या सामन्यात श्रीलंकेनं नामिबियासमोर गुडघे टेकले आणि त्यानंतर यूएईला नेदरलँडनं सहज हरवलं. त्यामुळे या चार संघांपैकी सुपर 12च्या तिकिटासाठी नामिबियापाठोपाठ नेदरलँडनंही आपला हक्क सांगितला आहे. याचा अर्थ श्रीलंकन संघाची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. नेदरलँडची सरशी प्रभावी आक्रमणाच्या जोरावर नेदरलँडनं यूएईला 111 धावात रोखलं होतं. पण 112 धावा करताना नेदरलँडलाही चांगलाच घाम गाळावा लागला. नेदरलँडनं अखेरच्या ओव्हरमध्ये एक बॉल बाकी ठेऊन हा सामना जिंकला. नेदरलँडच्या या विजयात मॅक ओडाऊड (23) , कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स (ना. 16) आणि टिम प्रिंगल (15) यांनी महत्वाचं योगदान दिलं. त्याआधी लीड्स (3 विकेट्स) आणि क्लासेन (2 विकेट्स) यांच्या प्रभावी आक्रमणामुळे यूएईला 8 बाद 111 धावाच करता आल्या.

जाहिरात

हेही वाचा -  T20 World Cup: नामिबियाच्या विजयानंतर सचिनची खास रिअ‍ॅक्शन; म्हणाला, ‘नामिबिया…’ श्रीलंका अडचणीत क्वालिफाईंग फेरीतील ए आणि बी या दोन ग्रुपमध्ये 4-4 असे 8 संघ आहेत. या 8 पैकी प्रत्येक गटातून 2-2 संघ सुपर 12 फेरीत दाखल होणार आहेत.  आज ए ग्रुपमधीतील दोन सामने पार पडले. त्यात नामिबिया आणि नेदरलँडनं विजय मिळवला. तर श्रीलंका आणि यूएईला पराभव स्वीकारावा लागला. पॉईंट टेबलमध्ये श्रीालंकेचा संघ सध्या तळाच्या स्थानावर पोहोचला आहे.

News18

त्यामुळे या गटात नामिबिया, नेदरलँड आणि श्रीलंका या संघांमध्ये सुपर 12 च्या तिकिटासाठी चुरस रंगणार आहे. इतकच नव्हे तर नेदरलँडविरुद्धच्या सामन्यावर श्रीलंकेचं भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून असेल. स्पर्धेतलं आव्हान जिवंत राखायचं असेल तर श्रीलंकेला पुढचे दोन्ही सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात