तिरुअनंतपूरम, 28 सप्टेंबर: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा पहिल्याच टी2 मुकाबल्यात 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. रोहित शर्माच्या फौजेनं या सामन्यात ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला. आधी अर्शदीप, दीपक चहर आणि हर्षल पटेलनं बॉलिंगमध्ये कमाल केली. त्यानंतर सूर्यकुमार आणि लोकेश राहुलच्या नाबाद अर्धशतकांनी भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. पण टीम इंडयाच्या या विजयी कामगिरीनंतरही एक समस्या मात्र रोहित शर्मा आणि कंपनीसमोर कायम आहे. ती म्हणजे 19व्या ओव्हरची. 19व्या ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई आशिया कपपासून 19 वी ओव्हर म्हणजे विरोधी टीमसाठी धावांची टाकसाळ ठरतेय. याच ओव्हरमध्ये आतापर्यंत अनेक धावा निघाल्या आहेत. आशिया कपमध्ये तर टीम इंडियाला 19वी ओव्हर चांगलीच महागात पडली होती. ऑस्ट्रेलियाविरद्धच्या मालिकेतही मोहालीच्या सामन्यात नेमकं तेच झालं. आणि आज दक्षिण आफ्रिकेची सुरुवातीला घसरगुंडी उडूनही 19 व्या ओव्हरमध्ये त्यांनी 17 रन्स लुटले. आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भुवनेश्वर कुमार महागडा ठरला होता. तर आज अर्शदीप सिंगलाही 19 व्या ओव्हरमध्ये नियंत्रित मारा करता आला नाही. हेही वाचा - Ind vs SA: टीम इंडियाचा ऑलराऊंड परफॉर्मन्स, पाहा भारताच्या यशामागचे 5 हीरो वर्ल्ड कपआधी उपाय सापडणार? हाणामारीच्या ओव्हर्समध्ये नियंत्रित मारा करणं टीम इंडियाला गेल्या काही सामन्यात जमलेलं नाही. आजही पॉवर प्लेमध्ये उत्तम गोलंदाजी करुनही अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजी ढेपाळली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल असे अनुभवी गोलंदाज सध्या भारतीय संघात आहेत. पण अखेरच्या ओव्हर्समध्ये हे तिघेही महागडे ठरत आहेत. खासकरुन 19वी ओव्हर प्रतिस्पर्ध्यांसाठी धावांचं कुरण बनतेय. आजही तिरुअनंतपूरममध्ये तेच झालं. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघाला या समस्येवर तोडगा काढणं गरजेचं आहे. सोशल मीडियात मीम्सचा पाऊस दरम्यान 19व्या ओव्हरवरुन सोशल मीडियात मात्र मीम्सचा पाऊस पडतोय. अनेक मीम्स त्यावर बनताना दिसत आहेत.
The 19th over Curse pic.twitter.com/8hkN1KDEhn
— Shivani (@meme_ki_diwani) September 28, 2022
19th Over 😐#INDvSA pic.twitter.com/iuRounq95m
— RVCJ Media (@RVCJ_FB) September 28, 2022
#INDvsSA
— 🇮🇳 رومانا (@RomanaRaza) September 28, 2022
Rohit: 19th over kaun karega?
Bowlers: pic.twitter.com/dVX3ISi1Vq
दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला पुढचा सामना 2 ऑक्टोबरला गुवाहाटीत होणार आहे.