मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पारपडणार आहे. या सामन्यातील नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार असून यात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील भारताने नाणेफेक जिंकली होती. त्यावेळी नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु शुभमन गिल वगळता इतर कोणताही खेळाडू न्यूझीलंड विरुद्ध मोठ्या धावा करू शकला नाही. तेव्हा आता भारतीय संघाने रायपूरच्या मैदानावर खेळताना वेगळा प्लॅन आखला आहे. हे ही वाचा : IND VS NZ : न्यूझीलंड करू शकेल का भारताशी बरोबरी? कधी, कुठे पहाल सामना? भारताने दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून सुरुवातीला पासून घातक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याचे धोरण भारतीय संघाने आखले आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज यांच्या गोलंदाजीवर भारताचा डावं अवलंबून आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या दुसरा वनडे सामन्यात भारतीय संघात बदल करण्यात आले नाहीत. भारताची प्लेयिंग ११ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज हे ही वाचा : IND VS NZ : भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चालतं? बघा हा व्हिडिओ न्यूझीलंडची प्लेयिंग ११ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू/सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सॅंटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.