मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS NZ : भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चालतं? बघा हा व्हिडिओ

IND VS NZ : भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चालतं? बघा हा व्हिडिओ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आणि टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या सीरिजमधील दुसरी वन-डे मॅच  आज, शनिवारी 21 जानेवारी रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामना आज रायपूर येथे पारपडणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

आजचा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यात भारतीय संघ ही मॅच जिंकून न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड संघ हा सामना जिंकून मालिकेत भारताशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

हे ही वाचा  : RCB संघाच्या ट्विटर अकाऊंटवर हॅकर्सचा कब्जा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आणि टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या सीरिजमधील दुसरी वन-डे मॅच  आज, शनिवारी 21 जानेवारी रोजी रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. या स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅचचं आयोजन करण्यात आलं आहे.

अशातच मॅचच्या एक दिवस अगोदर म्हणजेच काल, शुक्रवारी युजवेंद्र चहलनं एक गमतीशीर व्हिडिओ तयार करून भारतीय टीमची रायपूर येथील ड्रेसिंग रूम दाखवली. एवढचं नाही, तर टीम इंडियाच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये काय काय समाविष्ट आहे? हेही त्यानं कॅमेऱ्यात दाखवलं.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओची सुरुवात चहल करतो. चहल म्हणतो की, ‘आज आम्ही तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये घेऊन जाणार आहोत.’ चहलनं सर्वात प्रथम रोहित शर्मा हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दाखवला. त्यानंतर तो म्हणाला की, ‘विराट कोहली आणि उपकॅप्टन हार्दिक पांड्या रोहितसोबत बसलेले आहेत.’ यानंतर त्यानं ईशान किशनवर कॅमेरा फोकस केला, आणि त्याला द्विशतकाबाबत विचारलं.

हे ही वाचा : Dan Christian Retirement : IPL गाजवणारा तो, या निर्णयावर का पोहोचला?

चहल याने या व्हिडिओत शेवटी भारतीय संघातील खेळाडूंसाठी जेवणाची कशी व्यवस्था असते, हे दाखवले. यात त्याने अनेक पदार्थ दाखवून शेवटी रायपूर स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमचे कौतुक केले.

First published:

Tags: Cricket, Cricket news, New zealand, Team india