मुंबई, 21 जानेवारी : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे पारपडणार आहे. वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आजचा दुसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यात भारतीय संघ ही सामना जिंकून न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तर न्यूझीलंड संघ हा सामना जिंकून मालिकेत भारताशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन करून न्यूझीलंडला 350 धावांच आव्हान दिल होत. यात शुभमन गिलची खेळी अत्यंत लक्षवेधी ठरली होती. या सामन्यात गिलने आंतरराष्ट्रीय सामन्यातील आपले पहिले द्विशतक ठोकले. आज मालिकेतील सामन्यात भारतीय संघासमोर न्यूझीलंडच कडवं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड हा संघ सध्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत प्रथम स्थानी आहे. त्यामुळे मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे दुसरा सामना जिंकण्यासाठी ते अधिक उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा ही रोहित शर्माकडे असून दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता कमी आहे.
हे ही वाचा : IND VS NZ : भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये काय चालतं? बघा हा व्हिडिओ
कधी होणार सामना :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात शनिवारी २१ जानेवारी रोजी वनडे मालिकेतील दुसरा सामना होईल. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. या स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास अगोदर नाणेफेक होईल.
कुठे पहाल सामान :
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना हा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह दाखवला जाईल. तसेच डिझनी+ हॉट्स स्टार अँपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, New zealand, Rohit sharma, Team india