मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: कॅप्टन असावा तर असा... नाकातून वाहत होतं रक्त, तरीही तो सेट करत होता फिल्डिंग, Video

Ind vs SA T20: कॅप्टन असावा तर असा... नाकातून वाहत होतं रक्त, तरीही तो सेट करत होता फिल्डिंग, Video

गुवाहाटी टी20त रोहितच्या नाकातून आलं रक्त

गुवाहाटी टी20त रोहितच्या नाकातून आलं रक्त

Ind vs SA T20: गुवाटीच्या मैदानात टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरली. यावेळी मैदानात आर्द्रता जास्त असल्यानं त्याचा त्रास खेळाडूंना जाणवत होता. सामन्यातल्या 12 व्या ओव्हरदरम्यान रोहित शर्माच्या नाकातून अचानकपणे रक्त वाहू लागलं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 03 ऑक्टोबर: कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वात सध्या टीम इंडिया चांगलीच फॉर्मात दिसतेय. आशिया कपचा अपवाद वगळता टीम इंडियानं गेल्या काही मालिकांमध्ये भरीव यश मिळवलं आहे. टी20 मालिकांचा विचार करता भारतीय संघानं काल रोहितच्या नेतृत्वात सलग 11वी मालिका आपल्या नावावर केली आणि हाही एक विक्रमच आहे. या सगळ्याच्या मागे आहे ते रोहितचं कुशल नेतृत्व. काल गुवाहाटीच्या सामन्यात त्याच्या नेतृत्वाचा आणखी एक खास पैलू समोर आला.

रोहितच्या नाकातून रक्त

237 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर गुवाटीच्या मैदानात टीम इंडिया फिल्डींगसाठी मैदानात उतरली. यावेळी मैदानात आर्द्रता (Humidity) जास्त असल्यानं त्याचा त्रास खेळाडूंना जाणवत होता. सामन्यातल्या 12 व्या ओव्हरदरम्यान रोहित शर्माच्या नाकातून अचानकपणे रक्त वाहू लागलं. त्यानं लगेच ते पुसलं पण रक्त येणं सुरुच होतं. यावेळी दिनेश कार्तिकनं त्याला बाहेर जाण्याचा सल्ला दिला. रोहित मैदानाच्या बाहेर जात होता. पण त्याचवेळी सामन्यातली परिस्थिती लक्षात घेऊन तो बॉलर हर्षल पटेलला सल्लाही देत होता. इतकच नव्हे तर नाक पुसत पुसत मैदानाबाहेर जाताना तो फिल्डिंगही सेट करताना दिसला. रोहित शर्माचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्यानंतर प्राथमिक उपचार घेऊन रोहित पुन्हा मैदानात उतरला.

ऐतिहासिक मालिकाविजय

दरम्यान तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका जिंकली. 2015-16 च्या मोसमात दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेन ती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती.

हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं... त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं?

त्यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशा बरोबरीत राखल्या होत्या. त्यामुळे मालिका गमावण्याची वेळ आतापर्यंत त्यांच्यावर आली नव्हती. पण गुवाहाटीत भारतीय संघानं तो इतिहास पुसून टाकला. मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना इंदूरमध्ये मंगळवारी 6 ऑक्टोबरला होणार आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Sports, T20 world cup 2022, Team india