मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं... त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं?

Ind vs SA T20: गुवाहाटीत विराटनं जिंकली मनं... त्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहा किंग कोहलीनं काय केलं?

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक

विराट कोहली आणि दिनेश कार्तिक

Ind vs SA T20: विराट कोहलीच्या निर्णयाच सोशल मीडियातून अनेकांनी कौतुक केलं. बीसीसीआयनंही एक व्हिडीओ ट्विट करुन विराटची प्रशंसा केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 03 ऑक्टोबर: टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला गुवाहाटीच्या मैदानात 16 धावांनी मात दिली. या विजयासह भारतानं तीन टी20 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. हा विजय टीम इंडियासाठी खास ठरला. कारण मायदेशात आजवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतानं कधीही टी20 मालिका जिंकली नव्हती. पण गुवाहाटीतली लढत जिंकून रोहितच्या टीम इंडियानं नवा इतिहास घडवला. हा सामना भारतानं जिंकला असला तरी टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं मात्र अनेकांची मनं जिंकली.

त्या ओव्हरमध्ये काय घडलं?

भारतीय डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये विराट कोहली आणि दिनेश कार्तिक ही जोडी मैदानात होती. स्ट्राईक होतं दिनेश कार्तिककडे. पण नॉन स्ट्राईकवर असलेला विराट 49 धावांवर नाबाद होता. या ओव्हरच्या पहिल्या तीन बॉलमध्ये कार्तिकनं केवळ 4 रन्स केले. त्यावेळी त्यानं विराटला स्ट्राईकबाबत विचारणा केली. कारण विराटला तेव्हा अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती.

हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं... पाहा नेमकं काय झालं?

पण विराटनं त्यावेळी कार्तिकवर विश्वास दाखवताना बिनधास्त खेळण्याचा सल्ला दिला. आणि ओव्हरमधल्या चौथ्या आणि पाचव्या बॉलवर कगिसो रबाडाला दोन सिक्सर ठोकले. या ओव्हरमध्ये भारतानं 18 धावा वसूल केल्या. भारताच्या विजयात त्या धावा निर्णायक ठरल्या. कारण डेव्हिड मिलर आणि क्विंटन डी कॉकच्या फटकेबाजीमुळे भारतानं हा सामना केवळ 16 धावांनी जिंकला.

विराटचं कौतुक

विराट कोहलीच्या निर्णयाच सोशल मीडियातून अनेकांनी कौतुक केलं. बीसीसीआयनंही एक व्हिडीओ ट्विट करुन विराटची प्रशंसा केली आहे.

भारताचा धावांचा डोंगर

त्याआधी भारतानं या सामन्यात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना 3 बाद 237 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन रोहित शर्मानं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली.

त्यानंतर सूर्यकुमार आणि विराट कोहलीनं टीम इंडियाला 200 चा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमार यादवनं तर वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानं अवघ्या 18 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर 22 बॉलमध्ये 5 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावा फटकावल्या. विराटनंही आपला फॉर्म कायम राखताना 28 बॉल्समध्ये नाबाद 49 धावा केल्या. तर अखेरच्या ओव्हर्समध्ये मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनंही फटकेबाजी करताना 7 बॉलमध्ये नाबाद 17 धावा ठोकल्या.

मिलरची वादळी खेळी

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरचं शतक हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघ इतकी मोठी मजल मारेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण डेव्हिड मिलरच्या इनिंगमुळे गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेनं चांगलीच फाईट दिली.

मिलरनं अवघ्या 37 बॉल्समध्ये 8 फोर आणि 7 सिक्ससह नाबाद 106 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली मिलरचं हे दुसरं शतक ठरलं. मिलरनं अनुभवी क्विंटन डी कॉकच्या (69) साथीनं 174 धावांची अभेद्य भागीदारीही साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 221 धावांची मजल मारता आली. पण विजयापासून त्यांचे प्रयत्न 16 धावांनी दूर राहिले.

First published:

Tags: Cricket news, Sports, T20 world cup 2022, Virat kohali