मुंबई, 07 मार्च : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव आजही चाहत्यांच्या तोंडावर असते. 2013मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही आजही चाहत्यांमध्ये सचिनची क्रेझ आहे. आता चाहत्यांना पुन्हा सचिनला मैदानात खेळताना पाहायला मिळणार आहे. तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा सचिन वानखेडे मैदानावर खेळताना दिसणार आहे. सचिनने 2013मध्ये वानखेडे मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळत क्रिकेटला अलविदा केला. आता सचिन पुन्हा एकदा वानखेडेवर खेळताना दिसणार आहे. सचिन (Sachin Tendulkar) आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara) रस्ता सुरक्षेसाठी एक खास चॅरिटी सामना खेळणार आहेत. दोन्ही संघानी शुक्रवारी जोरदार सराव केला. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज हा सामना 7 ते 22 मार्च दरम्यान 11 सामने होणार आहेत. आजपासून वानखेडे मैदानावर या सामन्याला सुरुवात होईल. वाचा- VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई जगातील अनेक दिग्गज खेळाडू या चॅरिटी सामन्यात खेळणार आहेत. हा सामना कलर्स सिनेप्लेक्स आणि कर्लस कन्नड सिनेमावर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच, जर तुम्ही जिओ युझर असाल तर जिओ अप आणि वूटवरही तुम्ही हा सामना पाहू शकता. वाचा- हार्दिक पांड्याचा जलवा! 20 सिक्सर मारत अवघ्या 26 चेंडूत केल्या 144 धावा याआधी सचिनच्या सरावाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. निवृत्तीनंतर याआधी सचिनने 1-2 चॅरिटी सामने खेळले. याआधी ऑस्ट्रेलियातील आगीत झालेल्या नुकसानीसाठी सचिनने बुशफायर लीग खेळली होती. यातही त्याने शानदार फलंदाजी केली होती. वाचा- 6, 6, 6, 6, 6 : माही मार रहा है! IPLआधी धोनीची तुफान बॅटिंग, पाहा VIDEO
What is that one thing that makes you happy, instantly?
— Saiyami Kher (@SaiyamiKher) March 5, 2020
For me it’s watching @sachin_rt bat! Got lucky. Happened to be around when he was practising.
If he just bats in the nets once a month, I’m sure it’ll bring a smile to millions of faces 😁 pic.twitter.com/q4u8NAhgDl
वाचा- कोरोनामुळे IPL स्पर्धा पुढे जाण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती असे आहेत संघ- इंडियन लिजेंड्स- अजित अगरकर, साईराज बाहुतुले, संजय बांगर, समीर दीघे, मनप्रीत गोनी, मोहम्मद कैफ, जहीर खान, अभय कुरुविल्ला, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल, इरफान पठान, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग. वेस्ट इंडिज लिजेंड्स- सॅमुअल बद्री, सुलेमान बेन, टीनो बेस्ट, शिवनारायण चंद्रपॉल, पॅड्रो कॉलिंस, डॅरेन गंगा, कार्ल हूपर, डेंजा हयात, रिडली जॅकब्स, ब्रायन लारा, रिकार्डो पॉवेल, दीनानाथ रामनारायण, एडम सैनफोर्ड.