वाचा-CSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक आयपीएलच्या हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याआधी सर्वच संघ जोरदार सराव करत आहे. चेन्नईचा संघ गेल्या आठवड्यापासून सराव करत आहेत. मात्र धोनीच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष आहे. धोनीनं अखेरचा सामना वर्ल्ड कप 2019मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर धोनीने एकही सामना खेळलेला, त्यामुळं तब्बल 9 महिन्यांनंतर धोनी आयपीएलमध्ये खेळणार आहे. वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती धोनीने मानले CSKचे आभार आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची तयारी करीत असलेल्या धोनीने आपल्या संघाचे आणि फॅनचे आभार मानला. धोनीनं त्याला अधिक चांगला खेळाडू बनविल्याबद्दल CSK संघाचे आभार मानत, चेन्नई संघाने मैदानाच्या आत व बाहेर असलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यास मदत केल्याचे सांगितले. सीएसकेचे चाहते धोनीला 'थाला' म्हणतात आणि त्याला मिळालेले प्रेम आणि आदर विशेष असल्याचेही मत धोनीने व्यक्त केले. धोनीने यावेळी, 'खरं तर थाला म्हणजे भाऊ, चाहत्यांनी मला दिलेले प्रेम हे अविश्वसनीय आहे', असे सांगत भावुक झाला.BALL 1⃣ - SIX BALL 2⃣ - SIX BALL 3⃣ - SIX BALL 4⃣ - SIX BALL 5⃣ - SIX
ஐந்து பந்துகளில் ஐந்து சிக்ஸர்களை பறக்கவிட்ட தல தோனி! முழு காணொளி காணுங்கள் 📹👇 #⃣ "The Super Kings Show" ⏲️ 6 PM 📺 ஸ்டார் ஸ்போர்ட்ஸ் 1 தமிழ் 📅 மார்ச் 8 ➡️ @ChennaiIPL pic.twitter.com/rIcyoGBfhE — Star Sports Tamil (@StarSportsTamil) March 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.