जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई

VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई

VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने जुन्या स्टाईलमध्ये पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई

सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली खरी, मात्र चाहत्यांसाठी तो कायमच मैदानावर असतो. पण आता खरच पुन्हा सचिन मैदानात खेळताना दिसणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 मार्च : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचं नाव आजही प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या तोंडावर असते. सचिनचे जुने शॉट पाहून कोणत्याही क्रिकेट चाहत्याच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली खरी, मात्र चाहत्यांसाठी तो कायमच मैदानावर असतो. पण आता खरच पुन्हा सचिन मैदानात खेळताना दिसणार आहे. 8 मार्चपासून मुंबईत सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ही चॅरिटी मालिका खेळणार आहे. यात ब्रायन लारा, वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज खेळाडू असणार आहे. सचिन याच सामन्यासाठी सध्या मैदानात सराव करत आहे. अभिनेत्री सय्यामी खैरने नुकताच सचिनचा एक व्हिडीओ ट्वीट केला. यात तिनं सचिनला पुन्हा जुन्या अंदाजात खेळताना पाहणे , किती आनंददायी आहे असे कॅप्शन दिले. सचिन मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सध्या सराव करत आहे. यात सचिन आपल्या जुन्या अंदाजात गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- दोन आठवड्यांआधी मृत्यूशी झाला होता सामना, आता 5 विकेट घेत उडवली फलंदाजांची झोप

जाहिरात

वाचा- आफ्रिकेविरुद्ध मालिकेत होणार बदल; विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू होणार कॅप्टन सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेत इंडियन मास्टर राइड संघाचा कर्णधार आहे. सचिनच्या संघात वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, अजित आगरकर आणि मोहम्मद कैफ यांसारखे खेळाडू आहेत. वाचा- Eng vs Ind: पावसामुळे सामना रद्द, भारतीय महिला संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये आजही मैदानात कोणताही सामना असो सचिन…सचिन….सचिन असा आवाज स्टेडियमभर घुमतो. 20 वर्ष भारतासाठी क्रिकेट खेळल्यानंतर 2012मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून तर 2013मध्ये कसोटीमधून सचिनने निवृत्ती घेतली. आजही सचिनच्या नावावर असलेले रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेला नाही आहे. निवृत्तीनंतर सचिनने 1-2 चॅरिटी सामने खेळले. याआधी ऑस्ट्रेलियातील आगीत झालेल्या नुकसानीसाठी सचिनने बुशफायर लीग खेळली होती. यातही त्याने शानदार फलंदाजी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात