मुंबई, 06 मार्च : हार्दिक पांड्या म्हणजे भारतीय संघाचा हुकुमी एक्का आणि क्रिकेट इतिहासातला सर्वोत्तम खेळाडू. दुखापतीमुळे गेले कित्येक महिने क्रिकेटपासून दूर असणारा पांड्या अखेर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघात खेळण्याआधी पांड्या सध्या डीव्हाय पाटील टी-20 लीग खेळत आहे. या स्पर्धेत तीन सामन्यात पांड्याने सलग दोन शतक लगावले आहेत. एवढेच नाही तर त्यानं 26 चेंडूत 144 धावा केल्या. यात 20 षटकारांचा समावेश होता. चार सामन्यात 38 षटकारांसह केल्या 347 धावा हार्दिक पांड्याने डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यात त्याने पहिल्या सामन्यात 4 षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. यानंतर दुसर्या सामन्यात पांड्याने 10 षटकारांच्या मदतीने 105 धावा फटकावल्या. या सामन्यात त्याने 37 चेंडूत शतक पूर्ण केले. तिसर्या सामन्यात पांड्याने पुन्हा 4 षटकारांसह 46 धावा केल्या. आता चौथ्या सामन्यात त्याने 20 षटकारांच्या मदतीने 158 धावा केल्या. अशाप्रकारे पांड्याने चार सामन्यात 38 षटकारांच्या मदतीने 347 धावा केल्या आहेत. वाचा- कोरोनाव्हायरसचा क्रिकेटला सगळ्यात मोठा फटका, टी-20 प्रीमिअर लीगला स्थगिती गोलंदाजीतही हार्दिक पांड्याची यशस्वी कामगिरी हार्दिक पांड्याने फलंदाजीने केवळ डीव्हाय पाटील टी -20 स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीने तुफान कामगिरी केली आहे. पहिल्या दोन सामन्यात पांड्याने 10 विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यात पांड्याने 26 धावांत 5 बळी घेतले तर दुसर्या सामन्यात त्याने 26 धावा देऊन 5 बळी घेतले. वाचा- कोरोनाचा IPLला धोका; मुंबई, चेन्नई संघाचे ‘हे’ मुख्य खेळाडू खेळणार नाहीत? भारतीय संघात मिळणार जागा? हार्दिक पांड्याचा शानदार कमबॅक पाहता, त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळू शकते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होऊ शकते. हार्दिक पांड्या आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याची शक्यता कमी आहे. या मालिकेत विराट कोहलीला दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. वाचा- ‘आता IPLवर माझं करिअर नाहीतर…’, भारताच्या अव्वल फिरकीपटूने व्यक्त केली भीती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.