जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे क्रिकेट (Cricket) पोहोचलं आहे, तिथे तिथे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हे नाव पोहोचलं आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही सचिन तेंडुलकरचं नाव माहीत नसणारा क्रिकेटप्रेमी सापडणं मुश्कील. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सचिनने क्रिकेटमधले अनेक विक्रम व यशोशिखरं पादाक्रांत केलीच आणि आपल्या खेळाने क्रिकेटलाही नवी उंची प्राप्त करून दिली.
सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म मुंबईमध्ये 24 एप्रिल 1973 रोजी झाला. सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर स्वतः क्रिकेटपटू होता. त्याने सचिनला वयाच्या अकराव्या वर्षी प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांकडे नेलं. आचरेकर सरांनी स