नागपूर, 07 मार्च : कोरोनाव्हायरसचा (CoronaVirus) फटका साऱ्या जगाला बसला आहे. यामुळं फक्त जगाची अर्थव्यवस्थाच नाही तर अनेक कार्यक्रमही रद्द झाले आहे. आता कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रालाही मोठ फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र आता कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपूरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले.
दरम्यान याआधी बीसीसीआय अध्यत्र सौरव गांगुली यांनी कोणत्याही परिस्थितीत आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे सांगितले आहे. गांगुली यांनी कोरोनाचा आयपीएलला धोका नसून, ही स्पर्धा दिलेल्या वेळापत्रकानुसारच होईल, असे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र आता राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.
वाचा-कोरोनाचा IPLला धोका; मुंबई, चेन्नई संघाचे ‘हे’ मुख्य खेळाडू खेळणार नाहीत?
विदेशी खेळाडूही चिंतेत
आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी खेळाडू सहभागी असतात. मात्र आता खेळाडू आणि क्रिकेट बोर्डही खेळाडूंना इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी तयार नाही आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने व्यक्त केली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाव्हायरस संबंधित चिंता व्यक्त केली आहे. न्यूझीलंड बोर्डाच्या म्हणण्यानुसार, आयपीएल दरम्यान ते आपल्या प्रत्येक खेळाडूला कोरोनाव्हायरस अपडेट देईल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह एकूण 6 खेळाडू आयपीएल 2020 खेळणार आहेत.
वाचा-कोरोनाव्हायरसचा क्रिकेटला सगळ्यात मोठा फटका, टी-20 प्रीमिअर लीगला स्थगिती
BCCIने नेमणार सल्लागार समिती
सध्या बीसीसीआयने 29 मार्चपासून सुरू होणार्या आयपीएल आणि कोरोनाव्हायरसच्या संबंधित कोणतेही मार्गदर्शक सूचना देश-विदेशातील खेळाडूंना देण्यात आलेले नाहीत. वास्तविक, आयपीएल दरम्यान सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी ाचाहते मोठ्या संख्येने येतात अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच खेळाडू व अधिकाऱ्यांसाठी सल्ला आणि मार्गदर्शक सूचना जारी करू शकेल. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौर्यावर आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यापूर्वीही खेळाडूंना कोणाशीही हात मिळवू नये असे सांगितले आहे.
वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
भारतात आतापर्यंत 31 रुग्ण
सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे.
टी-20 प्रीमिअर लीगला स्थगिती
भारतात होणाऱ्या आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगलाही ग्रहण लागले आहे. मात्र आता कोरोनामुळे टी -20 प्रीमिअर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लीगमध्ये गेलसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. कोरोना विषाणूचा क्रिकेटला बसलेला हा दुसरा मोठा झटका आहे.