मुंबई : आशिया कपमधून गुडघ्याच्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा बाहेर पडला. त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्याला पूर्ण आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे तो सहाजिकच टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. टी २० वर्ल्ड कप खेळण्याची संधी हुकल्यानंतर रविंद्र जडेजानं एका पोस्ट शेअर केली आहे. टी २० वर्ल्ड कपसाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र दुखापतीमुळे आता ते पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे जडेजानं पोस्ट शेअर करून मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जडेजानं आपल्या इन्स्टावर फोटो पोस्ट करून एकावेळी एक पाऊल असं कॅप्शन देऊन पोस्ट शेअर केली. त्यानंतर अनेकांनी त्याला लवकर बरा हो अशा शुभेच्छा दिल्या आणि प्रार्थनाही केली आहे. क्रिकेटप्रेमी देखील जडेजाला खूप मिस करत आहेत. हे वाचा-४ वेळा विश्व चषक जिंकलेल्या खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण सुरेश रैनानं त्याला लवकर बरा हो! अशी कमेंट केली आहे. जडेजाच्या गुडघ्याला आशिया कपमध्ये दुसऱ्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे पुढचे दोन सामने तो खेळू शकला नाही. आता टी २० वर्ल्ड कपमधून बाहेर गेला आहे. मैदानात कधी परतणार याबाबत सध्या तरी कोणतीही माहिती जडेजानं दिली नाही. हे वाचा-Heart Attack ने माजी अंपायरचं निधन, क्रिकेट विश्वात शोककळा सर्जरीनंतरही जडेजानं फोटो शेअर केला आणि यामध्ये कर्मचारी, BCCI, सपोर्टीव्ह स्टाफचे आभार मानले होते. टी २० वर्ल्ड कपमध्ये जडेजाच्या जागी निवड समितीनं अक्षर पटेलला संधी दिली आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाकडून खेळतो. आशिया कपमध्ये देखील त्याला जडेजाच्या जागी खेळवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.