मुंबई : क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आयसीसीचे माज अंपायर आणि पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचं निधन झालं आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटर असद रऊफ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असद रऊफ यांचं निधन झाल्याची माहित त्यांच्या भावाने ताहिर यांनी दिली. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. आपलं दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर निधनाची बातमी समोर आली. त्यांना ट्वीटरवरून श्रद्घांजली वाहिली जात आहे.
फोटो सौजन्य- BCCI
हे वाचा-४ वेळा विश्व चषक जिंकलेल्या खेळाडूनं अचानक घेतला संन्यास, नेमकं काय कारण बीसीसीआयने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंगवर बंदी घातल्यानंतर असद रऊफ लाहोरच्या लांडा बाजारात कपड्यांचे आणि चपलांचे दुकान चालवत होते. त्यांनी आतापर्यंत १७० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भूमिका निभावली. त्यांन ४९ कसोटी, २३ टी २० आणि ९८ वन डे सामने खेळले.
Former Umpire Asad Rauf 🇵🇰🏏 passed away in Lahore due to cardiac arrest aged 66 pic.twitter.com/HSGInNADW0
— Tharaka D Jayathilaka 🇱🇰 (@Tharaka_jaya) September 15, 2022
हे वाचा-T20 World Cup नंतर विराट कोहली घेणार संन्यास? असद यांनी १५ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी टीव्ही अंपायरची भूमिका बजावली. असद यांची अंपायरिंग कारकीर्द 2000 ते 2013 अशी होती. दरम्यान, ते आयसीसीच्या एलिट अंपायरिंग पॅनेलचा सदस्यही होते. ट्वीट करून त्यांना अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.