मुंबई : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळल्यानंतर ३८ दिवसांनी अचानक संन्यास घेण्याची घोषणा खेळाडूनं केली. गेल्या काही दिवसांत क्रिकेटमधील अनेक खेळाडूंनी संन्यास घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. या खेळाडूच्या निर्णयामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ४ वेळा विश्वकप विजेत्या टीममधील खेळाडूनं असा अचानक संन्यास का घेतला याची चर्चा रंगली आहे. ऑस्ट्रेलियन महिला दिग्गज क्रिकेट रेचेल हेन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हेन्स ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल क्रमांकावर फलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केलं.
Australia's four-time World Cup winner has announced her retirement from international cricket.
— ICC (@ICC) September 14, 2022
Details ⬇️https://t.co/5vULk3JDd7
हेन्स महिला बिग बॅश लीगच्या आगामी मोसमात सहभागी होणार असली तरी तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला प्रवास थांबवल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रिलियाच्या महिला क्रिकेट टीमला याचा मोठा फटका बसणार आहे. हेन्सने 2009 मध्ये वन डे क्रिकेटमधून डेब्यू केला. अवघ्या तीन दिवसांनंतर, हेन्सने ऑस्ट्रेलियासाठी पहिला कसोटी सामना खेळला आणि 2 धावांनी शतक हुकलं. तिने 2013 आणि 2022 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी दोन ICC महिला विश्वचषक तसेच 2018 आणि 2020 मध्ये दोन T20 विश्वचषक जिंकले. आयसीसीने हेन्सच्या निवृत्तीनंतर ट्विट करत लिहिले, ‘ऑस्ट्रेलियाच्या चार वेळा विश्वचषक विजेत्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे’.